एक्स्प्लोर

भुजबळांची रवानगी कोणाच्या सांगण्याने, डॉ. लहानेंचं उत्तर

मुंबई : कोणाच्या सांगण्यावरुन राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जे जे रुग्णालयातून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं, याचा गुंता आणखी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयातील इडी कोर्टात 'जेजे'चे डीन डॉक्टर तात्याराव लहाने यांनी आपलं लेखी उत्तर दिलं आहे. दोन नोव्हेंबर रोजी जे जे हॉस्पिटलने छगन भुजबळांचा ताबा आर्थर रोड कारागृह अधिकाऱ्यांना दिला होता. त्यामुळे भुजबळांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये का दाखल केलं गेलं आणि कोणाच्या सांगण्यावरुन दाखल केलं गेलं याच्याशी जे जे हॉस्पिटलचा काहीही संबंध नसल्याचा दावा तात्याराव लहानेंनी केला आहे. तसंच आपण कोर्टाचा कुठेही अवमान केला नाही, किंवा आपल्या अधिकाराचा गैरवापर केलेला नाही, असंही तात्याराव लहाने यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केलं आहे. सध्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आर्थर रोड तुरुंगात असलेले छगन भुजबळ हे वारंवार तब्येतीच्या कारणास्तव जेलबाहेर रुग्णालयात रहात आहेत. भुजबळांची तब्येत ठणठणीत असून जे. जे. रूग्णालयाचे डीन डॉक्टर तात्याराव लहाने आणि आर्थर रोड जेलच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने छगन भुजबळ सतत तब्येतीच्या कारणास्तव जेलबाहेर रुग्णालयात रहात असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. छगन भुजबळ यांच्या तब्येतीबाबत ज्या ज्या टेस्ट केल्या गेल्या आहेत त्याचे रिपोर्ट्स अंजली दमानिया यांनी सेशन्स कोर्टात सादर केले. भुजबळांचे रिपोर्ट्स पाहिले तर ते विराट कोहली इतके फिट आहेत असा युक्तीवाद अंजली दमानिया यांनी केला. दोन ते तीन दिवसात केल्या जाणाऱ्या टेस्ट्ससाठी छगन भुजबळ महिनाभर जे. जे. किंवा बाँम्बे हॉस्पिटलमध्ये कसे काय राहतात असाही युक्तिवाद अंजली दमानिया यांनी केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 21 January 2024वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुलेंचं एकत्रित CCTV फुटेज, केजचे निलंंबित उपनिरीक्षक राजेश पाटीलही कराडसह असल्याचं उघडSai Ali Khan Discharge : सैफ अली खानला Lilavati Hospital मधून डीस्चार्जABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 21 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
Maharashtra Politics: शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंची खेळी, भाजपची ताकद वाढणार
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंनी डाव टाकला, भाजपची ताकद वाढणार
पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी मोठी अपडेट, शेतकऱ्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी, घोटाळ्याची व्याप्ती वाढणार? 
पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी मोठी अपडेट, शेतकऱ्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी, घोटाळ्याची व्याप्ती वाढणार? 
Ski Resort Hotel Fire Accident : हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
Embed widget