एक्स्प्लोर
Advertisement
तोडगा काढा, जेट एअरवेज कर्मचारी आक्रमक, कार्यालयाबाहेर ठिय्या
बैठकीनंतर अधिकाऱ्यांना बाहेर जाऊ देणार नाही, असा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे. सरकारनं दोन कोटी रोजगाराचं आश्वासन दिलं होतं. आम्ही देशात निवडणूक सुरु असतांनाच बेरोजगार होतोय, अशा भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
मुंबई : बँकांकडून 400 कोटींची मदत न मिळाल्याने जेट एअरवेजची सेवा पूर्णपणे बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे हजारो कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. यामुळे जेट एअरवेज कर्मचाऱ्यांचा जेट एअरवेजच्या ऑफिसबाहेर ठिय्या धरला आहे. जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत हटणार नाही, असा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे.
बुधवारी मध्यरात्रीपासून जेट एअरवेजची सेवा पूर्णपणे बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे एका रात्रीत हजारो कर्मचारी बेरोजगार होणार आहेत. यावर काही तोडगा काढावा, यासाठी कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
दरम्यान, जेट एअरवेज ऑफिसर्स आणि स्टाफ असोसिएशनची सध्या बैठक सुरु आहे. मात्र, बैठकीनंतर अधिकाऱ्यांना बाहेर जाऊ देणार नाही, असा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे. सरकारनं दोन कोटी रोजगाराचं आश्वासन दिलं होतं. आम्ही देशात निवडणूक सुरु असतांनाच बेरोजगार होतोय, अशा भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
जेट एअरवेज कंपनीने घेतलेला निर्णय अचानक आहे. यामुळे हजारो कर्मचारी रस्त्यावर आले आहेत. आता बैठक आहे, यात व्यवस्थापनाने या सर्व कर्मचाऱ्यांबाबत काय निर्णय घेतला हे सांगावं. असं अचानक कर्मचाऱ्यांना कामावरून काढता येणार नाही, असं जेट एअरवेज एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष किरण पावसकर यांनी सांगितले आहे.
बँकांकडून 400 कोटींची मदत न मिळाल्याने जेट एअरवेजचा सेवा पूर्णपणे बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी रात्री 12 वाजेपासून जेट एअरवेजची विमानसेवा बंद करण्यात आली आहे. जेट एअरवेज सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. काही दिवसांपूर्वी जेटची मुंबई-नाशिक विमानसेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली होती. परंतु काल रात्रीपासून आपली सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला.
आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजने बँकांकडे 400 कोटी रुपयांची मागणी केली होती. परंतू बँकांकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याने काल रात्री 12 नंतर जेटची विमानसेवा बंद होणार करण्यात आली. आज रात्री 10.30 वाजता जेट एअरवेजचं शेवटचं विमान उडणार आहे.
जेट एअरवेजच्या आर्थिक अडचणी वाढल्यानंतर 25 मार्च रोजी संस्थापक नरेश गोयल यांनी आपल्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. काही दिवसांपूर्वीच जेटची आंतरराष्ट्रीय विमानसेवा देखील बंद करण्यात आली होती. जेट एअरवेज बंद पडल्यानं 20 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बीड
Advertisement