एक्स्प्लोर
Advertisement
विमानातील क्रू मेंबर्सचा जीवावर बेतणारा हलगर्जीपणा
विमान आकाशात गेल्यानंतर हवेचा दाब नियंत्रित करण्याचा स्वीच सुरु करण्यास क्रू मेंबर्स विसरले.
मुंबई : मुंबई-जयपूर विमानाची एक मोठी दुर्घटना होता-होता टळली आहे. विमान आकाशात गेल्यानंतर हवेचा दाब नियंत्रित करण्याचा स्वीच सुरु करण्यास क्रू मेंबर्स विसरले. त्यामुळे अनेकांच्या नाकातून रक्त येण्यास सुरुवात झाली. जेट एअरवेजच्या ‘9W 697’ या फ्लाईटमध्ये हा प्रकार घडला
विमानात एकूण 166 प्रवाशी होते. सकाळी 5 वाजून 53 मिनिटांनी मुंबईहून जयपूरसाठी उड्डाण केलं होतं. झालेली चूक लक्षात येताच विमान पुन्हा मुंबईच्या विमानतळावर उतरवण्यात आलं. काही प्रवाशांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
सध्या या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश डीजीसीएकडून देण्यात आले आहेत. तर क्रू मेंबर्सना कामावरुन हटवण्यात आलं आहे.
#WATCH: Inside visuals of Jet Airways Mumbai-Jaipur flight that was turned back to Mumbai airport midway today after a loss in cabin pressure (Source: Mobile visuals) pic.twitter.com/SEktwy3kvw
— ANI (@ANI) September 20, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement