एक्स्प्लोर

मुंबई तुंबण्यावर जपानी उतारा, शहरात जलबोगद्यांच्या निर्मितीचा विचार

जपानमधील टोकियो शहरात जमिनीखाली मोठे मोठे जलबोगदे तयार करुन त्यात पावसाचे साचलेले पाणी साठवून नंतर ते समुद्रात सोडण्याची योजना यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. याच प्रकारची उपाययोजना मुंबईत राबवता येऊ शकते का?

मुंबई : प्रत्येक पावसाळ्यात मुंबई शहराची तुंबई होते. तुंबलेल्या पाण्यामुळे ठिकठिकाणी रस्ते, रेल्वेमार्ग बंद होतात. यावरील उपायांबाबत चर्चा करण्यासाठी आज महापालिका आयुक्तांसोबत जपानच्या तंत्रज्ञांची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत जपानची राजधानी टोकियोमधील अधिकारी व तंत्रज्ञांनी विशेष सादरीकरण केले. हे तंत्रज्ञ उद्या महापालिका क्षेत्राचा अभ्यास दौरा करुन अहवाल सादर करणार आहेत. जपानमधील टोकियो शहरात जमिनीखाली मोठे मोठे जलबोगदे तयार करुन त्यात पावसाचे साचलेले पाणी साठवून नंतर ते समुद्रात सोडण्याची योजना यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. याच प्रकारची उपाययोजना मुंबईत राबवता येऊ शकते का? याची चाचपणी करण्याबाबत आज महापालिका मुख्यालयात जपानमधील संबंधित संस्थेचे अधिकारी आणि तंत्रज्ञ यांनी विशेष सादरीकरण केले. हे तंत्रज्ञ उद्या महापालिका अधिकाऱ्यांसोबत मुंबईतील तलावांचा, नद्यांचा आणि पाणी साचणाऱ्या परिसरांचा अभ्यास दौरा करुन नंतर त्याविषयीचा अहवाल सादर करणार आहेत. जपानच्या तंत्रज्ञ/ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे ⦁ टोकियो शहरामध्ये पावसाचे साचणारे अतिरिक्त पाणी साठवण्यासाठी जमिनीच्या खाली मोठमोठे जलबोगदे तयार करून त्यामध्ये पाणी साठवण्याची व नंतर हे पाणी समुद्रात सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ही उपाययोजना अंमलात आल्यानंतर टोकियो शहर पूरमुक्त झाले आहे. ⦁ या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या कामाचा अनुभव असणाऱ्या जपानमधील संबंधित संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि तंत्रज्ञांनी आज महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशींसमोर विशेष सादरीकरण केले. टोकियो शहराच्या धर्तीवर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातदेखील अशा प्रकारची उपाय योजना राबवता येऊ शकते का? या अनुषंगाने चाचपणी करण्याविषयी आजच्या बैठकीदरम्यान प्राथमिक चर्चा झाली. ⦁ टोकियोमध्ये जलबोगद्यात साठवलेले पावसाचे पाणी नंतर समुद्रात सोडले जाते. मात्र, मुंबईत अशा प्रकारचा प्रकल्प राबवावयाचा झाल्यास बोगद्यातील पाणी समुद्रात सोडण्याचा पर्याय खुला ठेवून ते पिण्यासाठी वापरता येऊ शकेल का? याविषयी अभ्यास करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकीत दरम्यान संबंधित तज्ज्ञांना दिल्या आहेत. ⦁ जपानच्या संबंधित संस्थेचे हे तज्ज्ञ उद्या महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पवई, विहार, तुळशी तलाव, मिठी नदी आणि तत्सम भागांचा अभ्यास दौरा करणार आहेत. नंतर या अभ्यास दौऱ्याचा अहवाल ते महापालिकेला सादर करणार आहेत. ⦁ पावसाचे पाणी मोठ-मोठ्या जलबोगद्यांमध्ये साठवण्याचा प्रकल्प मुंबईत राबवायाचा झाल्यास, त्यासाठी 'जपान इंटरनॅशनल को-ऑपरेटिव्ह एजन्सी' (JICA) ची मदत मिळविण्याचाही प्रयत्न करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : मोठी बातमी! तुकाराम मुंढे MPSC चौकशी समितीचे सचिव, मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक; शिवेंद्रराजेंची घोषणा; तर भीमनवार अध्यक्षपदी नकोत, रोहित पवारांची मागणी
मोठी बातमी! तुकाराम मुंढे MPSC चौकशी समितीचे सचिव, मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक; शिवेंद्रराजेंची घोषणा; तर भीमनवार अध्यक्षपदी नकोत, रोहित पवारांची मागणी
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन! मुंबई पोलिसांकडून आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन! मुंबई पोलिसांकडून आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल
Mumbai Protest : शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करणाऱ्या 300 हून अधिक आंदोलकांवर गुन्हा दाखल होणार, आदित्य ठाकरे-अमित ठाकरेंचं काय? 
शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करणाऱ्या 300 हून अधिक आंदोलकांवर गुन्हा दाखल होणार, आदित्य ठाकरे-अमित ठाकरेंचं काय? 
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget