एक्स्प्लोर

कराच्या वाढत्या भारामुळे मुंबईत घर खरेदी करणं आणखी कठीण!

मुंबईत कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्प यांसारख्या पायाभूत सुविधांसाठी पैसे जमा करण्यासाठी सरकारने स्टॅम्प ड्यूटीमध्ये एका टक्क्याची वाढ केली आहे. जो आता सहा टक्के झाला आहे. तर 12 टक्के जीएसटी आधीपासूनच लागतो.

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत स्वत:चं घर असावं, असं प्रत्येक मुंबईकराचं स्वप्न असतं. पण जे लोक या शहरात घर घेण्याची हिंमत करत आहेत, त्यांच्यावर कराचा प्रचंड भार पडत आहे. राज्य सरकारने स्टॅम्प ड्यूटीवर लागणारा पाच टक्के कर वाढवून सहा टक्के केला आहे. यामुळे घर खरेदीसाठी इच्छूक असणाऱ्यांची चिंता वाढली आहे. प्रत्येक भारतीयाचं स्वत:चं घर असावं, असं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाहिलं आहे. यासाठी त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनाही अंमलात आणली. घर खरेदी करणाऱ्यांना सरकारकडून मदतीची तरतूद यात करण्यात आली आहे. सरकार भलेही देशवासियांना घर देण्याचं स्वप्न पाहत असेल, पण त्यांचं स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही. कारण एकीकडे सरकार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर खरेदीसाठी मदत करत आहे, मात्र दुसरीकडे कर सातत्याने वाढत आहे. करामध्ये सातत्याने वाढ होत असल्याने लोकांचे घर खरेदी करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरत आहेत, असं जाणकार सांगतात. मुंबईत कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्प यांसारख्या पायाभूत सुविधांसाठी पैसे जमा करण्यासाठी सरकारने स्टॅम्प ड्यूटीमध्ये एका टक्क्याची वाढ केली आहे. जो आता सहा टक्के झाला आहे. तर 12 टक्के जीएसटी आधीपासूनच लागतो. म्हणजेच जर कोणी घर खरेदी करत असेल, तर त्याला घराच्या रक्कमेसह स्टॅम्प ड्यूटी (6 टक्के) आणि जीएसटी (12 टक्के) असा एकूण 18 टक्के कर भरावा लागत आहे. दरम्यान, घर खरेदी करणाऱ्यांची अडचण पाहून सरकारने 12 टक्के जीएसटी कमी करण्यासाठी आणि त्यावर फेरविचार करण्यासाठी समितीची स्थापना केली आहे. पण त्यावर कधी निर्णय होईल हे कोणाला माहित नाही. जाणकारांच्या मते, जोपर्यंत कोणता निर्णय होत नाही, तोपर्यंत सरकारचाच फायदा होणार आहे आणि निवडणुकीआधी यावर निर्णय होणं कठीण असल्याचं दिसतं.

महत्त्वाच्या बातम्या

'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Embed widget