एक्स्प्लोर

IndiGo Dubai-Mumbai Flight: दुबई-मुंबई विमानात मद्यपी प्रवाशांचा राडा, मुंबई विमानतळावरील सहार पोलिसांकडून दोन प्रवाशांना अटक

IndiGo Dubai-Mumbai Flight: विमानप्रवासात या दोन प्रवाशांना दारू पिण्यास सहप्रवाशांनी मनाई केल्यानंतर या प्रवाशांनी शिवीगाळ केली.

मुंबई : विमानांमध्ये धिंगाणा घालण्याचे प्रकार सातत्यानं वाढत आहेत. दुबई-मुंबई (IndiGo Dubai-Mumbai Flight) विमानात दोन प्रवाशांनी दारू पिऊन राडा केला. तसेच विमानप्रवासात या दोन प्रवाशांनी सहप्रवासी आणि दोन क्रू मेंबरला देखील शिवीगाळ केली. या घटनेनंतर दोघांना मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर लगेचच अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांनी या संदर्भात तक्रार केली. त्यानंतर प्रवाशाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. दत्तात्रय बापर्डेकर आणि जॉन डिसूझा अशी प्रवासांची नावं आहेत. मुंबई विमानतळावरील सहार पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. दोन्ही आरोपींनी आधी सीटवर बसून मद्यपान केलं आणि नंतर विनाकारण विमानात फिरत होते, असं सहप्रवाशांनी सांगितलं आहे.

राडा घातल्याप्रकरणी दोघांना अटक

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही प्रवासी वर्षभरापासून दुबईत होते. दुबईत एकत्र काम करत होते.  मायदेशी वर्षभरानंतर परतल्याचा आनंद ते विमानात साजरा करत होते. दरम्यान प्रवाशांनी विमानप्रवासात गैरवर्तन केले. फ्लाईटमध्ये राडा होण्याचे हे सातवे प्रकरण आहे. लघुशंका प्रकरणानंतर अनेक प्रकरणं समोर आली. सहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबई-मुंबई विमानात दारू पिऊन धिंगाणा घातल्याप्रकरणी दोन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. या दोन प्रवाशांविरोधात कलम 336 आणि विमानप्रवासाशी संबंधित कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

सहप्रवाशांना शिवीगाळ

सहार पोलिसंनी दिलेल्या माहितीनुसार, विमानप्रवासात या दोन प्रवाशांना दारू पिण्यास सहप्रवाशांनी मनाई केल्यानंतर या प्रवाशांनी शिवीगाळ केली. तसेच दारू पिणे सुरूच ठेवले. जेव्हा एअरलाईन्स कर्मचाऱ्यांनी त्यांच्या जवळील बॅगमधील दारूची  बॉटल घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांना देखील शिवीगाळ केली. 

विमान प्रवासात गोंधळ घातल्याचे सातवे प्रकरण

विमान प्रवासात गैरवर्तन केल्याचे हे सातवे प्रकरण आहे. काही दिवसांपूर्वी 11 मार्चला रत्नाकर द्विवेदी या अमेरिकी नागरिकाने लंडन- मुंबई प्रवासादरम्यान सिगरेट ओढण्यास मनाई केल्यानंतर त्याने जबरदस्तीने एमर्जन्सी एग्झिटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यानंर त्याला अटक करण्यात आली. 14 मार्चला प्रवाशाची  25 हजाराच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली. त्यानंतर तो पुन्हा अमेरिकेला गेला. 

प्रवाशांच्या असभ्य वर्तनानंतर धोरणात बदल

महत्त्वाची बाब म्हणजे, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं (DGCA) टाटा समूहाच्या मालकीच्या विमान कंपनीला (एअर इंडिया) गेल्या काही दिवसांत दोन आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये प्रवाशांशी असभ्य वर्तन केल्याबद्दल दंड ठोठावला आहे. सुधारित धोरणात नेमका काय बदल झालाय, हे अद्याप सविस्तरपणे सांगण्यात आलेलं नाही. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Air India Urination Row : प्रवासी महिलेवर लघुशंका प्रकरणी एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड, पायलटचं लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त
धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Santosh Deshmukh : मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये  महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
Yohan Poonawalla : ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
Sick Leave : सावधान... आजारी असल्याचं सांगून सुट्टी घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट, कंपन्यांकडून डिटेक्टिव्ह एजन्सीची नेमणूक
वैद्यकीय रजा घेणाऱ्यांमागं खासगी कंपन्यांकडून गुप्तहेर, नेमकं काय घडलं? कुणी घेतली अनोखी सेवा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh Beed Protest : धनंजय देशमुख यांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन; मनोज जरांगे आंदोलनस्थळी दाखल100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 13 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सSanjay Raut Mumbai : मुख्य आरोपी मोकाट, ..त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत; बीड प्रकरणावर राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त
धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Santosh Deshmukh : मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये  महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
Yohan Poonawalla : ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
Sick Leave : सावधान... आजारी असल्याचं सांगून सुट्टी घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट, कंपन्यांकडून डिटेक्टिव्ह एजन्सीची नेमणूक
वैद्यकीय रजा घेणाऱ्यांमागं खासगी कंपन्यांकडून गुप्तहेर, नेमकं काय घडलं? कुणी घेतली अनोखी सेवा
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
Beed News: धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
INDIA Alliance Controversy : भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
Nashik Accident : नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
Embed widget