एक्स्प्लोर

मुंबईतील अपुऱ्या वाहतूक सुविधांमुळे विद्यार्थ्यांची परवड, मुंबई आयआयटीचे संशोधन

मुंबई : अपुऱ्या वाहतूक सुविधांमुळे मुंबईत शैक्षणिक असमानता निर्माण होऊ शकते, मुंबईतील वाहतूक सुविधेतील त्रुटींमुळे अनेक शाळांमध्ये प्रवेश घेणे सहज शक्य नाही, असे मुंबई आयआयटीच्या संशोधनात समोर आले आहे.

मुंबई : अपुऱ्या वाहतूक सुविधांमुळे मुंबईत शैक्षणिक असमानता निर्माण होऊ शकते, अशा प्रकारचा चित्र सद्यस्थितीत मुंबई आयआयटीच्या (IIT Mumbai) संशोधनात मांडले आहे. अपुऱ्या वाहतूक सुविधांमुळे मुंबईत शैक्षणिक असमानता निर्माण होऊ शकते, बृहन्मुंबईतील वाहतूक सुविधेतील त्रुटींमुळे अनेक शाळांमध्ये प्रवेश घेणे सहज शक्य नाही, असे मुंबई आयआयटीच्या संशोधनातून समोर आले आहे.  मुंबईत एकसमान शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुंबईत शाळांची, बसेसची संख्या वाढविणे, लोकल रेल्वेमार्गांचा विचार करून शाळा जवळ असणे गरजेचं असल्याचं संशोधनात नमूद केले आहे. मुंबई आयआयटीच्या सिव्हिल इंजिनियरिंग विभागातील प्राध्यापक डॉ. गोपाल पाटील आणि गजानंद शर्मा यांनी बृहन्मुंबई क्षेत्रातील मुलांना शाळेत जाण्यासाठी खाजगी आणि सद्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यावर अभ्यास केला आहे. हे  संशोधन Elsevier जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. 

कुठल्या माहितीच्या आधारे संशोधन करण्यात आले ?

यावर संशोधन करताना संशोधकांनी मुंबईत पुरेशी सार्वजनिक तसेच खाजगी वाहतूक व्यवस्था उपलब्ध आहे का ? ही व्यवस्था सर्व ठिकाणी एकसमान उपलब्ध आहे का? आणि परिसरात शाळा पुरेशा संख्येने आहेत का? याची माहिती जमा केली. शिवाय, मुलांना शाळेत जाताना प्रवास करण्यासाठी किती वेळ लागतो ? शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी एकसमान वाहतूक व्यवस्था उपलब्ध आहे का? या सगळ्या बाबींचा विचार करून हे संशोधन केले गेले आहे.

संशोधनतून नेमके काय समोर आले ?
या संशोधनातून समोर आले आहे की, बृहन्मुंबईच्या सर्व भागांमध्ये एकसमान वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून दिल्या गेल्या नाहीत. काही भागांमध्ये जिथे शाळा आहेत तिथे पुरेसे बस थांबे आहेत, त्यासोबतच त्याठिकाणी लोकल रेल्वेची सुद्धा चांगली कनेक्टिव्हिटी आहे. अशा ठिकाणी मुलांना सहज शाळेत प्रवास करणे सोयीचे ठरते. तर काही ठिकाणी जिथे खाजगी आणि सार्वजनिक वाहतूक सेवा पुरेशी नाही त्या भागात विद्यार्थ्यांना शाळा दूर पडते आणि प्रवासाचा वेळ 40-60 मिनिटे किंवा त्याहून अधिक लागतो. त्यामुळे अशा स्थितीत अपुऱ्या वाहतूक सेवेमुळे शैक्षणिक असमानता मुंबईत निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

सार्वजनिक वाहतूक सेवेपेक्षा खाजगी वाहतूक सेवा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याचे सुद्धा यामध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यासाठी शहरात एक समान धोरण आणि पायाभूत सुविधांचा योग्य प्रकारे नियोजन करणे गरजेचं असल्याचं संशोधकांचा म्हणणं आहे. एक कार्यक्षम प्रशासन प्राथमिक सार्वजनिक सेवा जसे की रस्ते, वाहतूक, शाळा आणि इतर महत्वाच्या सेवा सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असते. जेणेकरून समाजातील प्रत्येक घटकाला या सुविधांचा लाभ घेता येईल. त्यात शहरातील पुरेशी वाहतूक व्यवस्था ही जास्तीत जास्त मुलांना शाळेत पोहचण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते

कुठे आणि किती शाळांचा सर्वेक्षण केले गेले ?

या संशोधनासाठी महानगरपालिकेच्या 577 झोनमध्ये असलेल्या 4308 शाळांचे विश्लेषण केले गेले. बृहन्मुंबई क्षेत्राचे महामंडळ, जे जवळपास 460 चौ. किमी पर्यंत विस्तारलेले आहे. संशोधकांनी जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम (GIS) सॉफ्टवेअरचा वापर शाळा, जवळचे बस स्टॉप आणि इतर संबंधित भौगोलिक मापदंड यावर अभ्यास करण्यासाठी केला आहे. त्यानंतर त्यांनी प्रत्येक शाळा कशी जोडली गेली ? वाहतूक व्यवस्था कशी आहे? याचे मूल्यांकन केले. त्यात शाळेत पोहचण्यासाठी लागणारा वेळ आणि वाहतूक व्यवस्था यावर विचार केला गेला आहे. या मिळालेल्या डेटाच्या आधारे डेटाचे विश्लेषण करण्यासाठी अल्गोरिदम आणि सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाचा वापर केला आहे

संशोधनातून ज्या गोष्टी नमूद केल्यात त्यातून प्रशासनाला काय करणे गरजेचे आहे ?

संशोधकांना असेही आढळून आले की, मुंबईत प्राथमिक शाळांच्या तुलनेत उच्च माध्यमिक शाळांची संख्या कमी आहे आणि त्या दूर स्थित आहे. शिवाय, माध्यमिक शाळांची प्रवेशक्षमता सुद्धा प्राथमिक शाळांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे शैक्षणिक असमानता वाढत चालली आहे. मुंबईतील भांडुप, गोराई सारख्या भागांमध्ये शाळांची संख्या पुरेशी नाही, तर मानखुर्द, माहुल आणि ट्रॉम्बे सारख्या भागात सार्वजनिक वाहतुकीची गरज जास्त आहे. त्यामुळे संशोधनाच्या निष्कर्षमध्ये बृहन्मुंबईतील शाळांची, बसेसची संख्या वाढविणे, लोकल रेल्वे मार्ग कनेक्टिव्हिटी आणखी सुधारणे सद्यस्थितीत गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाल्यास यावर आणखी संशोधन केले जाईल, अस सुद्धा संशोधकांकडून सांगण्यात आले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti Seat Sharing In Maharashtra : पुढील 24 तासात महायुतीच्या उर्वरित सर्व जागांची घोषणा होणार; ठाणे, नाशिक अखेर कोणाच्या वाट्याला?
पुढील 24 तासात महायुतीच्या उर्वरित जागांची घोषणा होणार; ठाणे, नाशिक अखेर कोणाच्या वाट्याला?
ठाण्यात आयपीएलवर सट्टेबाजी, छत्तीसगडच्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
ठाण्यात आयपीएलवर सट्टेबाजी, छत्तीसगडच्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
EVM : ठाण्यात ईव्हीएम सापडले; जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा खुलासा
ठाण्यात ईव्हीएम सापडले; जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा खुलासा
''अमित शाह, तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात, त्या शाळेचा मी हेडमास्टर''; राऊतांचे घणाघाती बाण
''अमित शाह, तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात, त्या शाळेचा मी हेडमास्टर''; राऊतांचे घणाघाती बाण
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

UdayanRaje Bhosle On Congress : लोकांना गायब करणं ही काँग्रेसची परंपरा, उदयनराजेंची टीकाLok Sabha Election Parbhani : परभणीत जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर  मतदानावरचा बहिष्कार मागेSupreme Court On EVM : ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेव्दारे मतदान अशक्य, ईव्हीएम-व्हीव्हीपॅटवर कोर्टाचा निकालZero Hour Full : मुंबई उत्तर-मध्यमधून महायुतीचा उमेदवार ठरेना, मविआचं ठरलं, महायुतीकडून चाचपणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahayuti Seat Sharing In Maharashtra : पुढील 24 तासात महायुतीच्या उर्वरित सर्व जागांची घोषणा होणार; ठाणे, नाशिक अखेर कोणाच्या वाट्याला?
पुढील 24 तासात महायुतीच्या उर्वरित जागांची घोषणा होणार; ठाणे, नाशिक अखेर कोणाच्या वाट्याला?
ठाण्यात आयपीएलवर सट्टेबाजी, छत्तीसगडच्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
ठाण्यात आयपीएलवर सट्टेबाजी, छत्तीसगडच्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
EVM : ठाण्यात ईव्हीएम सापडले; जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा खुलासा
ठाण्यात ईव्हीएम सापडले; जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा खुलासा
''अमित शाह, तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात, त्या शाळेचा मी हेडमास्टर''; राऊतांचे घणाघाती बाण
''अमित शाह, तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात, त्या शाळेचा मी हेडमास्टर''; राऊतांचे घणाघाती बाण
ABP Majha Impact : निवडणूक अधिकाऱ्यांनी जेवणासाठी 25 मिनिटे मतदान थांबवलं, यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांना नोटिस जारी
निवडणूक अधिकाऱ्यांनी जेवणासाठी 25 मिनिटे मतदान थांबवलं, यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांना नोटिस जारी
नारायण-सॉल्टनं पंजाबला धू धू धुतलं, कोलकात्याची 261 धावांपर्यंत मजल
नारायण-सॉल्टनं पंजाबला धू धू धुतलं, कोलकात्याची 261 धावांपर्यंत मजल
''कोण बी उठतंय बोगद्याचा दरवाजा उघडतंय''; मोहिते पाटलांचं गावरान भाषण, सांगितला पवार भेटीचा किस्सा
''कोण बी उठतंय बोगद्याचा दरवाजा उघडतंय''; मोहिते पाटलांचं गावरान भाषण, सांगितला पवार भेटीचा किस्सा
Fact Check : एमएस धोनी पर्स घरी विसरला, 600 रुपयांची केली मागणी, नेमकं सत्य काय ?
Fact Check : एमएस धोनी पर्स घरी विसरला, 600 रुपयांची केली मागणी, नेमकं सत्य काय ?
Embed widget