एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईतील डोसेवाल्यावर आयकर विभागाचा छापा
मुंबईः आयकर विभागाने आतापर्यंत काळापैसा काढण्यासाठी धाड टाकलं असल्याचं तुम्ही ऐकलं असेल. मात्र रस्त्यावर डोसा विकणाऱ्याच्या गाडीवर आयकर विभागाने छापा टाकल्याचं ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. मुंबईतील घाटकोपरमध्ये असंच एक उदाहरण समोर आलं आहे.
घाटकोपरचे साई स्वाद डोसावाले आयकर डिक्लेरेशन स्कीमचे बळी ठरले आहेत. कारण खाऊगल्लीतल्या त्यांच्या गाड्यावर जमणारी गर्दी आयकर अधिकाऱ्यांच्या डोळ्यावर आली. त्यांनी आठ दिवस रेड्डींच्या गाड्यावर पाळत ठेवली आणि नवव्या दिवशी विजय रेड्डींवर धाड टाकली.
विजय रेड्डींच्या गाड्यावर 45 प्रकारचे डोसे मिळतात. ज्याची किंमत 70 रुपयांपासून 160 रुपयांपर्यंत आहे. गाड्यावर मिळणाऱ्या स्वादिष्ट डोशांसाठी तुफान गर्दी जमते. त्यामुळं विजय रेड्डींचा गल्ला आणि त्यांनी जाहीर केलेलं उत्पन्न याबाबत आयकर अधिकाऱ्यांना संशय होता. धाड टाकली तेव्हा गल्ल्यात फक्त 60 हजार रुपयेच मिळाले. मात्र त्यातील काही पैसे मित्रांचे असल्याचा दावा रेड्डींनी केला.
काय आहे आयकर डिक्लेरेशन स्कीम?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्पन्न जाहीर न करणाऱ्यांना आणि काळा पैसा लपवणाऱ्यांना एक संधी दिली आहे. आयकर डिक्लेरेशन स्कीम अंतर्गत 1 जून ते 30 सप्टेबरपर्यंत संपत्ती जाहीर करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार एकूण संपत्तीवर 30 टक्के दराने कर आणि 25 टक्के कृषी कल्याण उपकर भरावा लागणार आहे.
आयकर वेळेत न भरल्याची शिक्षा म्हणून 25 टक्के दंडही भरावा लागणार आहे. यानंतर एकूण रकमेच्या 45 टक्के कर भरुन इतर पैसा कायदेशीर करुन घेण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र हा सगळा व्यवहार आयकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन करणं भाग होतं. मात्र सप्टेंबर महिना निम्मा उलटल्यानंतरही आयकर डिक्लेरेशनला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी आता 'ऑपरेशन वसुली' सुरु केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
मुंबई
करमणूक
Advertisement