एक्स्प्लोर

मुंबईत तोक्तेच्या कहरात झाडं उन्मळून पडली, विदेशी झाडांचे प्रमाण अधिक, आता वृक्ष परीक्षण होणार

तोक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत शेकडो झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. भविष्यात वादळ आलेच तर झाडे वादळाच्या तडाख्यातही उभी व मजबूत राहतील यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.  या पडलेल्या झाडांमध्ये विदेशी झाडांचे प्रमाण अधिक होते.

मुंबई: तोक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत शेकडो झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. भविष्यात वादळ आलेच तर झाडे वादळाच्या तडाख्यातही उभी व मजबूत राहतील यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.  या पडलेल्या झाडांमध्ये विदेशी झाडांचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे नवीन वृक्षारोपण करताना कोणती झाडे लावावीत, याबाबतच्या धोरणाचा अभ्यासपूर्ण पुनर्विचार करुन स्थानिक परिस्थितीनुसार झाडांची निवड करण्याबाबत धोरण ठरविण्याचा विचार करण्यात येणार आहे. तसेच वृक्ष परिक्षणाची (Tree Audit) कार्यवाही नियमितपणे करण्यात येईल, असेही उद्यान विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. 
 
16 व 17 मे 2021 रोजी मुंबई किनारपट्टी लगतच्या परिसरातून ‘तोत्के’ या चक्रीवादळाने मार्गक्रमण केले. या चक्रीवादळाचा मोठा प्रभाव महानगरपालिका क्ष्रेत्रात दिसून आला.  महापालिका क्षेत्रात वा-याच्या वेगाने तब्बल ११४ किलोमीटर प्रती तास पेक्षा अधिक वेग गाठल्याचे दिसून आले. याच वेगवान वा-यांमुळे महानगरपालिका क्षेत्रात 812 झाडे पडली. यापैकी, 504 झाडे ही खासगी क्षेत्रातील असून 308 झाडे ही सार्वजनिक परिसरातील आहेत. ही झाडे अनेक ठिकाणी रस्त्यांवर व सार्वजनिक परिसरात पडली होती. ज्यामुळे वाहतुकीस अडथळा होण्याची शक्यता होती. तथापि, महापालिकेच्या उद्यान विभागाने अक्षरशः दिवसरात्र पद्धतीने नियोजन व कार्यवाही करुन ही पडलेली झाडे अल्पावधीत हटवून रस्ते मोकळे केले आहेत.

खासगी परिसरातील 504 व सार्वजनिक परिसरातील 308 यानुसार एकूण 812 झाडे पडली. यापैकी सुमारे 70 टक्के पडलेली झाडे ही विदेशी प्रजातींची आहेत.  सोनमोहर (Peltoforum), गुलमोहर, गुळभेंडी (Thespesia), रेन-ट्री, रॉयल पाम (नॉटल पाम) इत्यादी झाडांच्या प्रजातींचा समावेश आहे. ही बाब लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वृक्षारोपण करताना प्राधान्याने स्थानिक प्रजातींचीच झाडे लावणे गरजेचे असल्याचे समोर आले आहे. 
 
तीन दिवसांच्या कालावधीत पडलेल्या 812 झाडांमध्ये 249 झाडे ही शहर परिसरातील आहेत. तर 256 झाडे ही पूर्व उपनगरातील असून उर्वरित 307 झाडे ही पश्चिम उपनगरातील आहेत. यापैकी 545 झाडे ही 16 व 17  मे 2021 रोजी पडली. तर 267 झाडे ही 18 मे रोजी पडली आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 812 झाडे पडण्याव्यतिरिक्त वादळाच्या प्रभावामुळे 1 हजार 454 झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना देखील सदर कालावधी दरम्यान घडल्या. यापैकी 798 फांद्या या खासगी परिसरातील झाडांच्या होत्या. तर उर्वरित 666 फांद्या या सार्वजनिक परिसरातील होत्या.

निसर्ग चक्रीवादळामुळे ३२३ झाडे उन्मळून पडली!
गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे  ३ जून ते ६ जून २०२० या कालावधी दरम्यान ३२३ झाडे पडली होती. ज्यापैकी २२१ झाडे ही खासगी परिसरातील होती. तर १०२ झाडे ही सार्वजनिक परिसरातील होती. तर त्यानंतर ५ व ६ ऑगस्ट २०२० या दोन दिवसांच्या कालावधी दरम्यान देखील महापालिका क्षेत्रात वेगवान वा-यांमुळे ३५५ झाडे पडली होती. ज्यापैकी १७९ झाडे ही खासगी परिसरातील होती. तर १७६ झाडे ही सार्वजनिक परिसरातील होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget