एक्स्प्लोर
मुंबईत राष्ट्रवादीसोबत आघाडी अशक्य: संजय निरुपम
मुंबई: 'राज्यभरात आघाडी शक्य असली, तरी मुंबईत मात्र आघाडी अशक्य आहे.' असं स्पष्ट मत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी व्यक्त केलं आहे. आघाडी होऊ नये याबाबत मुंबईच्या नेते-कार्यकर्त्यांची भूमिका ठाम असल्याचं निरुपम यांनी यावेळी स्पष्ट केलं.
'आमचं वेगळं लढायचं ठरलं आहे, मुंबईत राष्ट्रवादीचीही तीच भूमिका आहे. म्हणूनच त्यांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.' अस म्हणत निरुपम यांनी स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट केलं.
'राज्यभरात जरी आघाडी झाली तरीही मुंबईत मात्र आघाडी होणार नाही. कारण की, मुंबईत राष्ट्रवादीनं त्यांची पहिली यादी जाहीर केली आहे. जर पहिली यादी जाहीर झाली असेल तर आघाडी कशी काय होऊ शकते? त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांचीही मुंबईत आघाडी करु नये हीच इच्छा आहे.' असं निरुपम म्हणाले.
दरम्यान, यावेळी बोलताना निरुपम यांनी भाजप आणि शिवसेनेवरही जोरदार हल्लाबोल केला. 'शिवसेना आणि भाजपनं पहिले आपसातील भांडणं मिटवावाती. कोण भ्रष्ट हे आधी ठरवावं.' असा टोला निरुपम यांनी लगावला.
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement