एक्स्प्लोर

नाणारची जमीन आधीच मारवाडी, गुजरातींना कशी मिळते? : राज ठाकरे

नाणार प्रकल्पाची जमीन आधीच गुजराती मारवाडी अशा परप्रांतीय लोकांना मिळते कशी? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

मुंबईनाणार प्रकल्पाची जमीन आधीच गुजराती मारवाडी अशा परप्रांतीय लोकांना मिळते कशी? त्यांना हा प्रकल्प येण्याआधीच याबद्दल माहिती होती. त्यामुळे आधीच त्यांनी जमिनी विकत घेऊन ठेवल्या आहेत असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला. ते एबीपी माझाशी बोलत होते. न्यायमूर्ती लोया प्रकरणात सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिला तो खूपच धक्कादायक आहे. आजकाल चौकशी करुनही न्याय मिळत नाही. अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केली. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? मोदी हे भारताचे पंतप्रधान नाहीत, तर ते गुजरातचे पंतप्रधान आहेत. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जमीन बळकावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे या सर्वांची चौकशी होणे गरजेचं आहे. पण सध्या चौकशीलाही किती न्याय मिळतो, हे दिसतंय. या सर्वांना प्रकल्प येण्याआधी माहिती असते. त्यामुळेच ते प्रकल्प येण्याआधी जमिनी खरेदी करतात. परप्रांतियांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जमिनी घेऊन ठेवल्या आहेत. मात्र प्रकल्प येण्याआधी ज्या परप्रांतियांनी जमिनी घेतल्या आहेत, त्यांची चौकशी झालीच पाहिजे. तुम्ही जमीन का घेतली, इथे प्रकल्प होणार आहे हे तुम्हाला कसं कळलं, असे प्रश्न त्यांना विचारायला हवेत. गुजरातमधले लोक महाराष्ट्रात ज्या ठिकाणी प्रकल्प होणार आहे, त्या ठिकाणी जमिनी कशा घेतात? त्यांना महाराष्ट्र सरकारनेच त्याबाबत माहिती दिली आहे, असा आरोप राज ठाकरेंनी केला. अशा लोकांची चौकशी करायची म्हटलं तरी न्यायमूर्ती लोया प्रकरणात काय झालं हे आपण पाहिलंच. पण महाराष्ट्रातील जमिनीबाबतची चौकशी होणं गरजेचं आहे. राज्य सरकार सांग काम्या "राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार हे सांग काम्या आहे. केंद्रातून जे सांगितलं जाईल, तेव्हढंच हे करतात. तोंडातून ब्र काढायची यांची हिंमत नाही. मुख्यमंत्री म्हणतात जर नाणार प्रकल्प महाराष्ट्रात झाला नाही, तर गुजरातला जाईल. पण गुजरातच का, अन्य राज्ये नाहीत का?"  असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.  VIDEO: ग्राऊंड झीरो रिपोर्ट : नाणार प्रकल्प काय आहे?   काय आहे नाणार प्रकल्प? खनिज तेलावरचा प्रक्रिया उद्योग नाणार परिसरात उभारला जाणार आहे जगातली सगळ्यात मोठी रिफायनरी असेल, असा दावा सरकारतर्फे करण्यात येतोय ही ग्रीन रिफायनरी असेल, असा दावाही सरकारतर्फे करण्यात आला आहे. प्रति दिन 12 लाख बॅरल कच्च्या तेलावर या प्रकल्पात प्रक्रिया होईल या रिफायनरीला वीजपुरवठा करण्यासाठी 2500 मेगावॅटचा औष्णिक विद्युत वीज प्रकल्प उभारण्यात येणार रिफायनरीला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी या ठिकाणी निःक्षारीकरण प्रकल्पाचीही उभारणी करण्यात येणार आहे. रिफायनरी म्हणजे प्रदूषण हे साधं सरळ समीकरण जगभर आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांचं धाबं दणाणलं आहे. या प्रकल्पामुळे काही हजार कलमांचे मालक असलेले अनेक शेतकरी एका दिवसात भूमीहीन होणार आहेत. शेतकऱ्याचा तोंडचा घास तोंडातच अडकला आहे. या प्रकल्पग्रस्त भागात जवळपास 12 लाख आंब्याची झाडं आहेत. तितकीच काजू आणि नारळाची झाडंही आहेत. त्याशिवाय काही हजार एकर भागात भातशेती होते.  याशिवाय नाचणी, वरी, कुळीथ, भाजीपाला याचंही उत्पन्न इथला शेतकरी दरवर्षी घेतो. इथल्या समृद्ध जंगलात वावडिंग, हरडा, चारोळे यांसारख्या अनेक औषधी वनस्पती सापडतात, त्यावर इथल्या भटक्या आणि आदिवासी समाजाचा उदरनिर्वाह चालतो. माधव गाडगीळ समितीने या परिसरातील अनेक गावं ही इको सेन्सेटिव्ह झोन म्हणून घोषित केली आहेत. हा प्रकल्प या गावात नसला तरी या प्रकल्पामुळे नैसर्गिदृष्ट्या महत्त्वाच्या प्रदेशावर विपरित परिणाम होणार आहे. या रिफायनरीमुळे या गावांमधील पिण्याच्या पाण्यावरसुद्धा संकट उभं राहिलंय, अशी भीती गावकऱ्यांना वाटायला लागली आहे. खरं तर रेड कॅटेगरीमधील उद्योग जैविकदृष्ट्या संवेदनशील गावात किंवा त्या परिसरात उभारु नयेत हे केंद्र सरकारचं नोटिफिकेशन आहे. मात्र सरकारने रिफायनरी, निःक्षारीकरण प्रकल्प आणि औष्णिक विद्युत प्रकल्प ही तीनही रेड कॅटेगरी उद्योग या परिसरात आणून स्वतःच्याच धोरणांना हरताळ फासला आहे. ग्रीन रिफायनरी हे गोंडस नाव असलं तरी त्याचं प्रदूषण रोखायचं आश्वासन पाळलं जाणार नाही याची धास्ती गावकऱ्यांना आहे. ही झाली इथल्या बागायतदारांची व्यथा... किनारपट्टी भागातल्या मासेमारांची व्यथा याहून निराळी नाही. विजयदुर्गच्या खाडीचा विस्तार खूप मोठा आहे. अनेक लहानसहान मासेमारांची दैनंदिनी या खाडीवर चालते. अनेक पाणबुडे मासेमार या खाडीच्या उथळ भागात बुडी मारत खडकावर येणारी मासळी पकडतात. दिवसाला शे-दोनशे कमावतात, त्यांनाही आता काय करावं, हा प्रश्नच समोर उभा ठाकला आहे. या किनारी भागातला मच्छिमार वर्षानुवर्षे या मासेमारीवर उदरनिर्वाह करणार आहे. रिफायनरीने इथलं प्रदूषण वाढेल किंवा निःक्षारीकरण प्रकल्पाने इथल्या पाण्यातील क्षार वाढतील मग करायचं काय.. जायचं कुठे हा प्रश्नच आहे. इथल्या जमिनीचा सर्व्हे करताना ही 80 ते 90 टक्के ओसाड जमीन असल्याचं शासनातर्फे सांगितलं जात आहे. मात्र प्रत्यक्षात इथे कोणतेही सर्वेक्षण झालं नाही. कारण, सरकारचा एकही अधिकारी इथे आला असता तर त्याला वेगळी वस्तुस्थिती दिसली असती, असा विश्वास स्थानिकांचा आहे. नाणार प्रकल्पातील गावांमधील 98 टक्के नागरिकांची असहमती पत्र सरकारला देण्यात आल्याचं इथले गावकरी सांगतात. मात्र आता नाणार प्रकल्पाला होत असलेला विरोध पाहता कोकणला विकास नको अशी ओरड व्हायला लागली आहे... पण खरंच कोणाला उद्योगधंदे प्रकल्प नकोयत? तर या प्रश्नाचं उत्तर हो असं आहे. कोकणला विकास हवा आहे. पण निसर्गाचा ऱ्हास करणारे प्रकल्प नव्हे, तर शेतीपुरक प्रकल्प कोकणाला द्यावेत, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. प्रकल्प येण्यापूर्वीच जमीन घोटाळा? मुळात हा प्रकल्प आणतानाही जमीन घोटाळा झाला असावा अशी शंका निर्माण होणाऱ्या काही गोष्टी समोर आल्या आहेत. एबीपी माझाने याचा पाठपुरावा केल्यानंतर एकधक्कादायक वास्तव समोर आलं. सरकारला या प्रकल्पासाठी जवळपास साडे पंधरा हजार एकर जमीन हवी आहे. यातली साडे तीन हजार एकर जमीन या प्रकल्पाची घोषणा होण्यापूर्वीच खरेदी करण्यात आलेली आहे. हाती आलेल्या कागदपत्रांनुसार, जैन, शाह, चावला अशा आडनावांच्या गुजराती मंडळींनी ही जमीन खरेदी केलेली आहे. त्यामुळे यांना ही जमीन खरेदी करण्यासाठी कुणी प्रवृत्त केलं हा मोठा प्रश्न आहे. सरकार जमीन अधिग्रहण करण्यासाठी जेव्हा मोबदला जाहीर करेन, तेव्हा हे सर्व गुंतवणूकदार सरकारकडे जातील आणि जमीन देण्यासाठी तयार होतील. यामुळे सरकारचं काम सोपं होईल. ग्रामस्थांनी जवळपास साडे तीन हजार एकर जमीन आम्हाला दिलेली आहे आणि शेतकरी या प्रकल्पासाठी सकारात्मक आहेत, असा दावा सरकारकडून त्यावेळी केला जाईल. गुंतवणूकदारांनी ही साडे तीन हजार एकर जमीन कवडीमोल भावाने शेतकऱ्यांकडून खरेदी केली आहे. मात्र सरकारकडून त्यांना किती तरी मोबदला अधिक मिळेल. जैतापूर प्रकल्पाला 22 लाख रुपये प्रति हेक्टरी मोबदला जाहीर केला होता. या प्रकल्पासाठी मोबदला किती तरी पटीने अधिक असेल. अशा पद्धतीने शेतकऱ्यांना किरकोळ पैसे मिळतील आणि गुंतवणूकदारांचंच भलं होईल, असं बोललं जात आहे. या सगळ्यावरून राजकारण झालं नसतं तर नवलच.. भाजपच्या मांडीला मांडी लावून राज्यसभेत आलेल्या नारायण राणेंनी या भागातला आपला संपलेला प्रभाव पुन्हा मिळवण्यासाठी नाणार प्रकल्पाला विरोध केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेलाही भरतं आलंय.. स्थानिक आमदार-खासदार यांच्या गावातल्या वाऱ्या वाढल्या आहेत. आमदार-खासदार यांनी कितीही आदळआपट केली तरी सत्तेत भागीदार असलेल्या भाजपला ते रोखू शकलेले नाहीत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hoarding Video : मुंबई होर्डिंग दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, अजूनही 30 जण अडकल्याची भीतीAmol Kolhe : शिरुरमध्ये पोलिंग एजंट बनून सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मनमानी कारभारEknath Shinde on Ghatkopar : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया ABP MajhaGhatkopar Hoarding Accident : मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू, 51 जणांना बाहेर काढण्यात यश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Embed widget