एक्स्प्लोर

Nawab Malik Tweet: हॉटेल द ललितमध्ये अनेक गुपितं! मंत्री नवाब मलिक यांच्या ट्विटने अनेकांच्या भुवया उंचावल्या

Nawab Malik Tweet: महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक हे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप करत आहेत. आता त्यांच्या आजच्या एका ट्विटने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Nawab Malik Diwali Tweet: क्रूझवर ड्रग्ज पकडल्यानंतर राज्याचं राजकारण तापलं आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेनंतर त्याची चर्चा वाढली. दरम्यान, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप करणारे मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी एक ट्विट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, हॉटेल द ललितमध्ये अनेक रहस्ये दडलेली आहेत, रविवारी भेटू. आपल्या ट्विटमध्ये मलिक यांनी लिहिलंय, की दिवाळीच्या शुभेच्छा. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हॉटेल ललितमध्ये अनेक रहस्ये दडलेली आहेत... रविवारी भेटू. नवाब मलिकांच्या या ट्विटनंतर लोकांमध्ये तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. रविवारी मलिक कोणत्या मुद्द्यावर बोलणार, यावर लोकांमध्ये चर्चा सुरू आहे.

राज्यात मलिक विरुद्ध वानखेडे
मंत्री नवाब मलिक हे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने गंभीर आरोप करत आहेत. समीर वानखेडे 10 कोटींचे कपडे घालतात, ते 70 हजारांचा शर्ट आणि 50 लाखांचे घड्याळ वापरतायेत. वानखेडे यांच्या शूजची किंमत अडीच लाख रुपये आहे. पीएम मोदींच्या कपड्यांपेक्षा वानखेडे यांच्या कपड्यांची किंमत जास्त आहे. समीर वानखेडे यांच्या पँटची किंमत एक लाख रुपये आहे. समीर वानखेडे यांनी ही वसुली केली असून त्याची चौकशी झाली पाहिजे, यावर मी ठाम आहे. अमली पदार्थांचा खुलेआम खेळ कुठेतरी राजकीय आश्रयाशिवाय चालू शकत नाही, असे आरोप मलिक यांनी मंगळवारी केले होते. 

वानखेडे यांचे प्रत्त्युत्तर
या आरोपांवर समीर वानखेडे म्हणाले होते की, आपल्याला गोवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे. समीर वानखेडे यांनी सांगितले होते की, सलमान नावाच्या एका पेडलरने माझ्या बहिणीशी संपर्क साधला होता, पण ती एनडीपीएस केसेस घेत नाही, म्हणून तिने त्याला परत पाठवले. सलमानने मध्यस्थांच्या माध्यमातून आपल्याला गोवण्याचा प्रयत्न केला होता. त्याला अटक करण्यात आली असून तो तुरुंगात आहे. नवाब मलिक यांच्या आरोपांवर समीर वानखेडे म्हणाले होते की, व्हॉट्सअॅप चॅट शेअर करून खोटे आरोप केले जात आहेत.

वानखेडे यांच्या पत्नी आणि बहिणीचे मलिकांवर आरोप
नवाब मलिक यांच्या आरोपांवर समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर आणि बहीण यास्मिन यांनीही प्रत्युत्तर दिले. बायको म्हणाली होती की सावनच्या आंधळ्याला हिरवळ दिसते. क्रांतीने ट्विटमध्ये लिहिले की, समीरची सर्व मालमत्ता त्याच्या आईने ती जिवंत असताना विकत घेतली आहे. समीर वानखेडे यांच्याकडे वयाच्या 15 व्या वर्षापासून ही मालमत्ता असून सर्व कागदपत्रे सरकारी अंमलदाराच्या नियमानुसार शासनाला सादर केली जातात. ते बेनामी मालमत्ता नाहीत.

तर बहीण यास्मिन म्हणाली, 'नवाब मलिक हे मंदबुद्धी आहे, त्याची मानसिक स्थिती तपासली पाहिजे. ते काय आरोप करत आहेत, आमच्याकडे माझ्या आईची भेट आहे, घड्याळ आईने भेट दिलं होते. माझा भाऊ वर्षभर पैसे गोळा करतो आणि वर्षातून एकदा खरेदी करुन तिच वर्षभर वापरतो. उलट मलिक यांचा जावई जग्वारसमोर उभा असतो, एवढा पैसा कुठून आला. तीन-चार कोटींच्या वाहनांसोबत त्याचे फोटो आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Pune Protest : अजित पवारांनी आम्हाला साथ द्यावी, लाडकी बहीण म्हणून चॉकलेट देतायत!
Eknath Shinde Speech Dadar :चक्रव्यूह भेदून शाहजीबापूने सगळ्यांना आडवं पाडलं, शिंदेंचं मुंबईत भाषण
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget