एक्स्प्लोर

Worli Hit And Run: वरळीत 'हिट अँड रन'; गाडीखाली चिरडून महिलेचा मृत्यू, चालक फरार

Worli Ht And Run: मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची घटना घडली आहे. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे.

Worli Hit And Run Accident: मुंबई : वरळीमध्ये (Worli Accident) हिट अँड रनची (Hit And Run) घटना घडली आहे. मासळी बाजारातून मासे आणण्यासाठी गेलेल्या कोळी दाम्पत्याला पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास एका चारचाकी गाडीनं उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात (Accident News) महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अपघातानंतर चालकानं घटनास्थळावरुन पलायन केल्याची माहिती मिळत आहे. फरार चालकाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. 

मुंबईतील (Mumbai Accidnet) वरळीत (Worli News) असलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची घटना घडली आहे. अॅट्रिया मॉलजवळच असणाऱ्या वरळी कोळीवाडा परिसरात राहणारं नाकवा हे कोळी दाम्पत्य सकाळी मासांच्या लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडलं होतं. मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीनं धडक दिली. दाम्पत्याकडे खूप सामान आणि मासे होते. त्यामुळे नवऱ्याचं दुचाकीवरचं नियंत्रण सुटलं आणि दोघेही चारचाकी गाडीच्या बोनेटवर पडले. नवऱ्यानं प्रसंगावधान राखत बोनेटवरुन बाजूला उडी टाकली. मात्र, महिलेला स्वतःला बाजूला होता आलं नाही. 

अचानक झालेल्या सर्व प्रकारामुळे चारचाकी गाडीचा चालक घाबरला होता. चालकानं गाडी पळवली. त्यात त्यानं बोलेटवर पडलेल्या कोळी महिलेला फरफटत नेलं. या अपघातात नवरा थोडक्यात बचावला. मात्र, महिला गंभीर जखमी झाली होती. महिलेला तात्काळ मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी महिलेला मृत घोषिक केलं.                                                                                      

अपघातात दुचाकी चालवणारा नवरा थोडक्यात बचावला असून महिलेचा मात्र गाडीखाली चिरडून मृत्यू झाला आहे. अपघातानंतर गाडीसह चालक पळून गेला आहे. पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू आहे.                           

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी अन् अग्नितांडवाचा कलंक सुरुच; 28 दिवसांत चौथ्यांदा आगीचे रौद्ररुप, तंबू जळाले, नोटांच्या दोन बॅगा जळून खाक

धस-मुंडे भेट टीआरपीसाठी घडवून आणलेली घटना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कडाडले, म्हणाले, राष्ट्रवादीचं महत्त्व...

Who Is Responsible For Delhi Railway Accident: नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? 'त्या' चुका ज्यामुळे गमावले 18 जणांनी प्राण
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? 'त्या' चुका ज्यामुळे गमावले 18 जणांनी प्राण
New Delhi Railway Station Stampede : नवी दिल्ली रेल्वेस्थानकारील चेंगराचेंगरीत 18 जणांचा दुर्देवी मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक, म्हणाले...
नवी दिल्ली रेल्वेस्थानकारील चेंगराचेंगरीत 18 जणांचा दुर्देवी मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Delhi Railway Station Stampede Updates : नवी दिल्ली स्थानकावर चेंगराचेंगरी, जबाबदार कोण?Delhi Railway Station : नवी दिल्ली स्थानकावर चेंगराचेंगरी, प्रत्यक्षदर्शींनी सांगितली थरारक घटनाABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 16 February 2025 सकाळी 8 च्या हेडलाईन्सNew Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी अन् अग्नितांडवाचा कलंक सुरुच; 28 दिवसांत चौथ्यांदा आगीचे रौद्ररुप, तंबू जळाले, नोटांच्या दोन बॅगा जळून खाक
महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी अन् अग्नितांडवाचा कलंक सुरुच; 28 दिवसांत चौथ्यांदा आगीचे रौद्ररुप, तंबू जळाले, नोटांच्या दोन बॅगा जळून खाक
धस-मुंडे भेट टीआरपीसाठी घडवून आणलेली घटना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कडाडले, म्हणाले, राष्ट्रवादीचं महत्त्व...
धस-मुंडे भेट टीआरपीसाठी घडवून आणलेली घटना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कडाडले, म्हणाले, राष्ट्रवादीचं महत्त्व...
Who Is Responsible For Delhi Railway Accident: नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? 'त्या' चुका ज्यामुळे गमावले 18 जणांनी प्राण
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? 'त्या' चुका ज्यामुळे गमावले 18 जणांनी प्राण
New Delhi Railway Station Stampede : नवी दिल्ली रेल्वेस्थानकारील चेंगराचेंगरीत 18 जणांचा दुर्देवी मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक, म्हणाले...
नवी दिल्ली रेल्वेस्थानकारील चेंगराचेंगरीत 18 जणांचा दुर्देवी मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक, म्हणाले...
New Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यू

माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल

... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा

धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ

Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.