एक्स्प्लोर

उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने निलंबित

मुंबई : उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांचं निलंबन करण्यात आले आहे. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत याबाबत माहिती दिली. औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये 2012 मध्ये झालेल्या प्रपाठक, अधिव्याख्याता व वर्ग 3 पदांवर नियमबाहय व चुकीच्या नियुक्त्या झाल्याचा ठपका ठेवलेले उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांना निलंबित करुन त्यांची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत केली. तसेच, या मराठवाडा विद्यापीठांमधील नियुक्त्यांसंदर्भात चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने दिलेल्या अहवालानुसार कारवाई करण्यासाठी मंत्रालयातील ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चाल-ढकल केली अथवा पाठीशी घातले अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही निवृत्त न्यायाधिशामार्फत चौकशी करण्यात येईल, असेही तावडेंनी स्पष्ट केले. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये 2012 मध्ये झालेल्या प्रपाठक, अधिव्याख्याता व वर्ग 3 मधील 53 पदांवर चुकीच्या पद्धतीने नियम डावलून भरती करण्यात आल्याच्या तक्रारी विविध संघटनांनी केल्या होत्या. त्या तक्रारींच्या अनुषंगाने उच्च शिक्षण संचालनालयाने 2014 मध्ये चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्ती केली होती. या समितीने आपला सविस्तर अहवाल शासनास या पूर्वीच सादर करुन या प्रक्रियेतील अधिकाऱ्यांविरुध्द नियमबाहय व चूकीच्या नियुक्त्यांचा ठपका ठेवला होता. या नियुक्त्या संबंधित प्राधिकरणाच्या अनुमती शिवाय बेकायदेशीर व मनमानी पद्धतीने केल्याचे अहवालात नमूद केले हेाते.  तरीही संबंधित दोषी अधिकाऱ्यांविरुध्द कारवाई करण्यात मंत्रालयातील वरिष्ठ दर्जाचे अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा मुद्दा सुभाष साबणे, अतुल सावे, प्रशांत बंब, जयप्रकाश मुंदडा आदी सदस्यांनी उपस्थित केला आणि दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची आग्रही मागणी केली. सदस्यांच्या या तीव्र भावना लक्षात घेऊन उच्‍च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी डॉ. धनराज माने यांना निलंबित करण्याची घोषणा केली. तसेच, या प्रकरणात कोणताही अधिकारी कितीही ज्येष्ठ असला तरीही त्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांविरुध्द कारवाई करण्यात येईल असेही तावडेंनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Fire Accident : मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?
मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?
Mumbai Local Train Fight : चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये प्रवाशांची तुफान हाणामारी; एकजण धावत्या ट्रेनमधून फेकला गेला, ज्याने पाहिलं ते सगळे हादरले
चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये प्रवाशांची तुफान हाणामारी; एकजण धावत्या ट्रेनमधून फेकला गेला, ज्याने पाहिलं ते सगळे हादरले
विश्वास बसणार नाही पण सत्य आहे, फक्त झोपून महिलेने कमावले 10 लाख रुपये, मुंबईची जिनिया ठरली 'स्लीप चॅम्पियन' 
विश्वास बसणार नाही पण सत्य आहे, फक्त झोपून महिलेने कमावले 10 लाख रुपये, मुंबईची जिनिया ठरली 'स्लीप चॅम्पियन' 
Vikhroli Railway Station Accident: विक्रोळी रेल्वे स्थानकात थरारक घटना, आयुष्याला वैतागलेला तरुण लोकल ट्रेनसमोर उभा राहिला, दुसरा प्रवासी धावत गेला अन् झटक्यात...
विक्रोळी रेल्वे स्थानकात थरारक घटना, आयुष्याला वैतागलेला तरुण लोकल ट्रेनसमोर उभा राहिला, दुसरा प्रवासी धावत गेला अन् झटक्यात...

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Tiger Attack: जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
Mumbai Fire Accident : मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?
मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Devendra Fadnavis: दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, अनेक दशक रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
Sonia Gandhi Journey of Love: माझ्या राजकारणातील प्रवेशास राहुल-प्रियांकाचा विरोध होता, सोनिया गांधींना सांगितलं पंतप्रधानपद नाकारण्यामागचं कारण
माझ्या राजकारणातील प्रवेशास राहुल-प्रियांकाचा विरोध होता, सोनिया गांधींना सांगितलं पंतप्रधानपद नाकारण्यामागचं कारण
Embed widget