एक्स्प्लोर
बोरीवलीत उच्च दाबाची जलवाहिनी फुटली, पिकअप हवेत उडाला!
बोरिवलीतील चिकुवाडी परिसरात सोमवारी मध्यरात्री स्थानिकांनी हवेत चक्क गाडी उडताना पाहिली आणि गाडीसुद्धा साधीसुधी नाही नव्हती, तर तो दणकट असा पिकअप ट्रक होता.
मुंबई : जलवाहिनी फुटून गाडी हवेत उडाल्याची घटना पश्चिम उपनगरातील बोरीवलीत घडली. बोरिवलीतील चिकुवाडी परिसरात सोमवारी मध्यरात्री स्थानिकांनी हवेत चक्क गाडी उडताना पाहिली आणि गाडीसुद्धा साधीसुधी नाही नव्हती, तर तो दणकट असा पिकअप ट्रक होता.
सोमवारी मध्यरात्री बोरीवली पश्चिमेतील चिकुवाडीच्या परिसरात एक उच्च दाबाची पाईपलाईन फुटली. पाण्याचा जोर इतका जबरदस्त होता की, काही मिनिटातच आसपासचा परिसर जलमय झाला. पण हे सारं इतक्यावरच थांबलं नाही.
रस्त्याच्याकडेला या पाईपलाईनवरच्या मॅनहोलवर उभा असलेला एक पिकअप ट्रक रोहित शेट्टीच्या सिनेमातील अॅक्शन सीनप्रमाणे क्षणधार्थ हवेत उडाला.
सुदैवाने या दुर्घटनेत कुणालाही इजा झाली नाही. मात्र आसपासच्या परिसरात एक मोठ झाड आणि लाईटचे पोल कोसळल्याने एकूण 4 गाड्या आणि 2 दुचाकींचं नुकसान झाल्याची माहीती आहे. तसेच याच परिसरातील एका इमारतीची 60 फुटी कंपाऊंड वॉल पडल्याने तिथेही बरंच नुकसान झालं.
मंगळवारी सकाळी महापालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाईपलाईनच्या दुरूस्तीचं काम हाती घेतलं.
पाहा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
विश्व
Advertisement