एक्स्प्लोर

High Court Relief to Hasan Mushrif: हसन मुश्रीफ यांना हायकोर्टाचा तूर्तास दिलासा; ईडीच्या प्रकरणात पुढील दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश

हसन मुश्रीफांना हायकोर्टाचा तूर्तास दिलासाईडीच्या प्रकरणात पुढील दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश

High Court Relief to Hasan Mushrif: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून (Bombay High Court) तूर्तास दिलासा मिळाला आहे. ईडीच्या प्रकरणात पुढील दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. हसन मुश्रीफ यांना मुंबई सत्र न्यायालयात रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिलेत. तसेच, सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं या अर्जावर तातडीनं सुनावणी पूर्ण करावी, असे निर्देशन हायकोर्टाने दिले आहेत. मात्र गुन्हा रद्द करण्यासाठीच्या याचिकेवरील सुनावणी तूर्तास हायकोर्टाकडून तहकूब करण्यात आली आहे.

हायकोर्टानं मूळ प्रकरणात दिलासा दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी ईडीनं छापेमारी सुरू केली होती. आमदार या नात्यानं आपण सध्या विधानसभेत व्यस्त असल्याची मुश्रीफांच्या वतीनं हायकोर्टात माहिती देण्यात आली. त्यावर बोलताना ईडीतर्फे एएसजी अनिल सिंह यांनी हायकोर्टात युक्तिवाद केला. 

पाहा व्हिडीओ : Hasan Mushrif ED : ईडी कारवाईविरोधात हायकोर्टाकडून हसन मुश्रीफ यांना तुर्तास दिलासा

ईडी सध्या करत असलेल्या तपासात हसन मुश्रीफांना आरोपी बनवलेलंच नाही. त्यामुळे तूर्तास त्यांच्या अटकेचा प्रश्नचं नाही. सध्या तपासअधिकारी प्राथमिक तपास करत आहेत. त्यांच्या तिन्ही मुलांनी या प्रकरणात सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केलेला आहे. जर त्यांना अटकेची भिती असेल तर त्यांनीही रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करावा, असा युक्तीवाद ईडीतर्फे एएसजी अनिल सिंह यांनी हायकोर्टात केला. 

राज्यात बदलेल्या राजकीय परिस्थितीमुळेच 10-12 वर्ष जुन्या प्रकरणांत तपास आता सुरू करण्यात आला आहे. ज्या कंपनीबाबत तपास सुरू आहे त्याच्याशी हसन मुश्रीफांचा कोणताही थेट संबंध नाही. ते या कंपनीत कुठल्याही पदावर नाहीत. या प्रकरणी हसन मुश्रीफांना कधीही अटक होऊ शकते. त्यामुळे त्यांना तातडीनं अटकेपासून संरक्षण देण्याची गरज आहे, असा युक्तिवाद मुश्रीफांचे वकील आभात पोंडा यांनी हायकोर्टात केला. 

दरम्यान, माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर ईडीकडून दोन महिन्यांत तीन वेळा छापेमारी करण्यात आल्यानंतर तसेच चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं याचिका दाखल केली आहे. हसन मुश्रीफ यांचे वकील प्रशांत पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केली आहे. या याचिकेवर आज (14 मार्च) सुनावणी होणार आहे. या याचिकेवरील निर्णयानंतर मुश्रीफ ईडीसमोर चौकशीसाठी हजर होणार की नाही? याबाबत निर्णय घेऊ, अशी माहिती प्रशांत पाटील यांनी दिली आहे. याबाबत ईडीला नोटीस देऊन माहिती दिल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बेळगाव मनपाचा कानडीकरणाचा वरवंटा, कोल्हापुरातील शिवसेनेच्या नेत्यांना जिल्हाबंदी; कर्नाटक सीमेवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
बेळगाव मनपाचा कानडीकरणाचा वरवंटा, कोल्हापुरातील शिवसेनेच्या नेत्यांना जिल्हाबंदी; कर्नाटक सीमेवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
Mumbai Car Fire: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर 'बर्निंग कार'चा थरार; चालक थोडक्यात बचावला, PHOTO
मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर 'बर्निंग कार'चा थरार; चालक थोडक्यात बचावला, PHOTO
Raj Thackeray: एकाचा पत्ता सुलभ शौचालय, राज ठाकरे म्हणाले, बसल्या बसल्या सही घेतली का?; आता निवडणूक अधिकाऱ्याचं स्पष्टीकरण, म्हणाले...
एकाचा पत्ता सुलभ शौचालय, राज ठाकरे म्हणाले, बसल्या बसल्या सही घेतली का?; आता निवडणूक अधिकाऱ्याचं स्पष्टीकरण, म्हणाले...
Maharashtra Live Updates: मतांमधील घोळ आणि मतचोरीविरोधात आज विरोधकांचा एल्गार
Maharashtra Live Updates: मतांमधील घोळ आणि मतचोरीविरोधात आज विरोधकांचा एल्गार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Keshav Upadhye On Voter List: 'हा अपयशाचा मोर्चा', भाजपचे Keshav Upadhye यांचा थेट हल्लाबोल
Raj Thackeray MNS Morcha: मनसेचा मोर्चा, राज ठाकरे लोकलने रवाना होणार
Raj Thackeray MNS Morcha: सत्याच्या मोर्चासाठी बाळा नांदगावकर रवाना, राज ठाकरेंसोबत प्रवास करणार
Harshwardhan Sapkal on Morcha: कार्यकर्ते आले म्हणजे आम्ही आलो, Congress अध्यक्ष Harshwardhan Sapkal यांची सारवासारव?
Voter List Scam: 'निवडणूक आयोग BJP चा पार्टनर म्हणून काम करतोय', MVA चा सरकारवर घणाघात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बेळगाव मनपाचा कानडीकरणाचा वरवंटा, कोल्हापुरातील शिवसेनेच्या नेत्यांना जिल्हाबंदी; कर्नाटक सीमेवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
बेळगाव मनपाचा कानडीकरणाचा वरवंटा, कोल्हापुरातील शिवसेनेच्या नेत्यांना जिल्हाबंदी; कर्नाटक सीमेवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
Mumbai Car Fire: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर 'बर्निंग कार'चा थरार; चालक थोडक्यात बचावला, PHOTO
मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर 'बर्निंग कार'चा थरार; चालक थोडक्यात बचावला, PHOTO
Raj Thackeray: एकाचा पत्ता सुलभ शौचालय, राज ठाकरे म्हणाले, बसल्या बसल्या सही घेतली का?; आता निवडणूक अधिकाऱ्याचं स्पष्टीकरण, म्हणाले...
एकाचा पत्ता सुलभ शौचालय, राज ठाकरे म्हणाले, बसल्या बसल्या सही घेतली का?; आता निवडणूक अधिकाऱ्याचं स्पष्टीकरण, म्हणाले...
Maharashtra Live Updates: मतांमधील घोळ आणि मतचोरीविरोधात आज विरोधकांचा एल्गार
Maharashtra Live Updates: मतांमधील घोळ आणि मतचोरीविरोधात आज विरोधकांचा एल्गार
Dharmendra Hospitalised: ‘बॉलिवूडचे ही-मॅन’ धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
‘बॉलिवूडचे ही-मॅन’ धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
MNS MVA Mumbai Morcha: मुंबईत जय्यत तयारी झाली, पण ‘सत्याच्या मोर्चाला’ अद्यापही परवानगी मिळेना; विनापरवाना मोर्चा काढल्यास कारवाईचा इशारा
मुंबईत जय्यत तयारी झाली, पण ‘सत्याच्या मोर्चाला’ अद्यापही परवानगी मिळेना; विनापरवाना मोर्चा काढल्यास कारवाईचा इशारा
चित्रपटाच्या पटकथेचे वास्तवात रूपांतर, मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटरने शेवट; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा
चित्रपटाच्या पटकथेचे वास्तवात रूपांतर, मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटरने शेवट; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा
Astrology : आज ध्रुव योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; कन्या राशीसह 'या' 5 राशींची लागणार लॉटरी, अचानक होणार धनलाभ
आज ध्रुव योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; कन्या राशीसह 'या' 5 राशींची लागणार लॉटरी, अचानक होणार धनलाभ
Embed widget