एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

निदान आता तरी लोकलच्या फेर्‍या वाढवत सर्वसामान्यांना प्रवासाची परवानगी द्या, हायकोर्टाची राज्य सरकारला सूचना

सरकारी कार्यालयामध्ये 100 टक्के कर्मचा-यांची उपस्थिती होत आहे. इतर आस्थापनेही पूर्ण क्षमतेने सुरू होत आहेत. त्यानुसार आता लोकांच्या सुविधेकरता रेल्वे सेवाही आवश्यक त्या क्षमतेनुसार सुरू करणं गरजेचं आहे.

मुंबई : कोरोना संसर्ग आता हळूहळू आटोक्यात येत असल्यानं राज्य सरकारनंही हळूहळू लॉकडाऊनचे नियम शिथिल केले आहेत. लॉकडाऊन नंतर आता दैनंदिन व्यवहार व दळणवळणही वाढत आहे. मात्र अपुर्‍या रेल्वे सेवेमुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत, म्हणून सर्वसामान्यांच्या सोयीसाठी लोकलच्या फेर्‍याही वाढवणं गरजेचे आहे. तेव्हा मध्य रेल्वेच्या फे-या 600 तर पश्चिम रेल्वेवरच्या फे-या 700 पर्यंत नेण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने विचार करावा. तसेच आता सर्वसामान्य लोकांनाही लोकल प्रवासाची परवानगी द्या अशी सूचना मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्यांडपीठानें राज्य सरकारला केली आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांप्रमानेच वकीलानांही लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी या मागणीसाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या वतीने अॅड मिलिंद साठे आणि ऍड उदय वारुंजीकर यांच्यामार्फत हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी हायकोर्टाने सांगितले की आपण अजुनही अंशतः लॉकडाऊनमध्ये आहोत. मॉल्स आणि हॉटेल सुरू मर्यादेत झाले आहेत. सरकारी कार्यालयामध्ये 100 टक्के कर्मचा-यांची उपस्थिती होत आहे. इतर आस्थापनेही पूर्ण क्षमतेने सुरू होत आहेत. त्यानुसार आता लोकांच्या सुविधेकरता रेल्वे सेवाही आवश्यक त्या क्षमतेनुसार सुरू करणं गरजेचं आहे. म्हणूनच ही गर्दी टाळण्यासाठी तिन्ही लाईनवरील रेल्वे मार्गांवर लोकलच्या फेर्‍या वाढवणे गरजेचं असल्याचं यावेळी हायकोर्टाने स्पष्ट केलं. या सुनावणी दरम्यान हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेल्या सूचनांवर गांभीर्यानं विचार करण्याचे निर्देश देत रेल्वेच्या फेर्‍या वाढवण्यासाठी रेल्वेलाही प्रस्ताव पाठवता येईल का ते पहा, अशी सुचना करत या याचिकेची सुनावणी 9 ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली.

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर मधील किती वकील न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी रेल्वेने प्रवास करण्यास इच्छुक आहेत?, त्याबाबत हायकोर्टानं बार असोसिएशनला विचारणा केली आहे. त्याची सविस्तर माहिती पुढील सुनावणीवेळी सादर करा असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझाMahayuti Oath Ceremony :  5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधीUddhav Thackeray On Mahayuti :विधानसभेची मुदत संपल्यानंतरही राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही-ठाकरेMahadev Jankar Vs Raosaheb Danve : EVM हॅक करता येतं मी स्वत: इंजिनिअर : महादेव जानकर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
Amshya Padvi : आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे  गटात राडा
आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे गटात राडा
Australia Social Media Ban : तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
Embed widget