एक्स्प्लोर

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोलवसुलीतून पैशांचा दुरुपयोग नको : हायकोर्ट

मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि आरटीआय कार्यकर्ता प्रवीण वाटेगावर यांनी स्वतंत्रपणे दाखल केलेल्या जनहित याचिकांवर हायकोर्टात न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरु आहे.

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोलबंदीबाबत 6 सप्टेंबरपर्यंत राज्य सरकारने आपला अंतिम निर्णय घ्यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. टोलवसुलीच्या रुपात जनतेच्या पैशांचा दुरुपयोग होऊ देऊ नका, जनतेच्या पैशांची रक्षा ही राज्य सरकारची जबाबदारी आहे, असं हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे. तसेच कंत्राटदाराने जर टोलवसुलीकरता दिलेल्या अधिकारांचा गैरवापर केला असेल तर ते कायद्याचं उल्लंघनच आहे. त्यामुळे तसे आढळल्यास राज्य सरकारने त्यावर कारवाई करावी असं हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे. मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि आरटीआय कार्यकर्ता प्रवीण वाटेगावर यांनी स्वतंत्रपणे दाखल केलेल्या जनहित याचिकांवर हायकोर्टात न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरु आहे. लालचुपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांच्या अहवालानुसार कंत्राटदारावर सध्या गुन्हा दाखल करता येत नाही. हे राज्य सरकारने हायकोर्टात सादर केलेल्या अहवालावरुन स्पष्ट झालं आहे. आयआरबीने हायकोर्टात आपली बाजू मांडताना स्पष्ट केलंय की त्यांच्याकडून कोणत्याही अधिकारचं उल्लंघन झालेलं नाही. राज्य सरकारसोबत झालेल्या करारनुसार साल 2019 पर्यंत त्यांना एक्स्प्रेसवेसोबत जुन्या मुंबई-पुणे रस्त्याचीही देखभाल, त्यावरील सोयीसुविधा याची संपूर्ण जबाबदारी आमच्यावरच आहे. त्यामुळे ठरलेल्या मुदतीपर्यंत टोलवसुली हा आमचा अधिकार आहे, असा दावा कंत्राटदाराच्यावतीने करण्यात आला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे संदर्भात एमएसआरडीसीकडून टोल बंद करायचा की नाही? यावर येत्या तीन आठवड्यांत अहवाल सादर होईल. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील सहा आठवड्यांनी राज्य सरकार टोलवसुलीबाबत आपला अंतिम निर्णय देणार आहे. एमएसआरडीसीने आपल्या अहवालातून स्पष्टीकरण द्याचयंय की कंत्राटदाराने आजवर किती टोलवसुली केलेली आहे? अपेक्षित अंदाजापेक्षा कमी टोलवसुली होत असल्याच्या आरोपांत कितपत तथ्य आहे. सुमित मलिक कमिटीच्या रिपोर्टनुसार काय पावलं उचलली गेली. कंत्राटदार जाणूनबुजून महामार्गावरुन टोल भरुन प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या कमी दाखवत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी कोर्टापुढे केला आहे. याचिकाकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर 2016 मध्ये 1300 कोटींची रक्कम कंत्राटदाराला अदा करुन राज्य सरकार मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे हा महामार्ग आपल्या ताब्यात घेऊ शकत होतं. मात्र अजूनही राज्य सरकारने यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे गेल्या 23 महिन्यांत कंत्राटदाराच्या झोळीत 1500 कोटी रुपये झाले आहेत. त्यामुळे जमा झालेली रक्कम ही ठरलेल्या रकमेपेक्षा खूप जास्त असल्याची माहिती सोमवारी हायकोर्टापुढे मांडण्यात आली. या याचिकेद्वारे राज्य सरकार जनतेच्या डोळ्यात धूळफेक करुन छोटे टोल बंद करुन बड्या कंत्राटदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Mumbai Crime News: आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!
आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
Devendra Fadnavis : मुंबई महानगरपालिकेत सत्ताधाऱ्यांकडून इनोव्हा गाड्यांच्या खरेदीसाठी पैशांची उधळपट्टी, देवेंद्र फडणवीस नाराज, भाजपच्या सभागृह नेत्यांनी मांडलेला प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की
मुंबई महानगरपालिकेत सत्ताधाऱ्यांकडून इनोव्हा गाड्यांच्या खरेदीसाठी पैशांची उधळपट्टी, देवेंद्र फडणवीस नाराज, भाजपच्या सभागृह नेत्यांनी मांडलेला प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Tukaram Mundhe Marathi News: तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
Embed widget