एक्स्प्लोर

बुलेट ट्रेनसाठीच्या भूसंपादनाला विरोध करणाऱ्या बांधकाम कंपनीला हायकोर्टाचा दिलासा

बुलेट ट्रेनसाठीच्या भूसंपादनाला विरोध करणाऱ्या बांधकाम कंपनीला हायकोर्टाचा दिलासा दिला आहे. ठाणे महापालिकेने 'अटलांटा'ला बजावलेली 'स्टॉप वर्क' नोटीस कोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे. आधुनिक प्रकल्पांची नक्कीच गरज आहे, मात्र त्यामुळे कुणावर अन्याय होणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी, असं मत हायकोर्टाने व्यक्त केली आहे

मुंबई : बुलेट ट्रेनसाठी जमीन संपादित करण्याला विरोध करणाऱ्या 'अटलांटा' या बांधकाम कंपनीविरोधातील 'स्टॉप वर्क' नोटीस रद्द करत मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. "प्रकरण न्यायप्रविष्ट आहे", हे बोलायला फार सोप्प असतं. मात्र त्यामुळे अनेकांना फार त्रास सहन करावा लागतो. अशा प्रकारच्या आधुनिक प्रकल्पांची आपल्याला नितांत गरज आहे, मात्र त्यामुळे उगाच कुणावर अन्याय होणार नाही, याची प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे, असं निरीक्षण न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती बी. पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठाने यावेळी नोंदवलं. या संबंधित कंपनीविषयी अनवधानाने चूक झाली असल्याची कबुली हायस्पीड रेल कॉर्पोरेशनच्या वकिलांनी हायकोर्टात दिली होती. ठाणे महापालिकेने 2 मे 2018 रोजी अटलांटा लिमिटेड या बांधकाम कंपनीला नोटीस बजावली होती. 'बांधकाम सुरु असलेली तुमची इमारत बुलेट ट्रेनसाठी राखीव करण्यात आलेल्या जमिनीवर उभारण्यात येत आहे', असे नमूद करुन बांधकाम थांबवण्याची नोटीस पालिकेने बजावली होती. ज्याला या कंपनीने हायकोर्टात आव्हान दिलं होतं. 'आमच्या कंपनीने मुंब्य्राजवळच्या आपल्या तीन हेक्टर जमिनीवर पूर्वीच निवासी इमारतींचे बांधकाम सुरु केलं आहे. दोन इमारती आधीच बांधून तयार झालेल्या असून तिसऱ्या इमारतीचं बांधकाम सुरु आहे. ठाणे महापालिकेने कमेन्समेंट सर्टिफिकेट म्हणजेच सीसीसह अन्य दिलेल्या परवानगीनंतरच हे बांधकाम सुरु केलं आहे. तसंच, 13 मार्च 2018 ला काढण्यात आलेली एक सार्वजनिक नोटीस कंपनीच्या पाहण्यात आली. त्यात हायस्पीड रेल कॉर्पोरेशनकडून भूसंपादन करण्यात येणार असल्याचं म्हटलं होतं. परंतु त्यात आमच्या कंपनीच्या जमिनीचा उल्लेख नव्हता. असं असतानाही ठाणे महापालिकेने आम्हाला काम थांबवण्याची नोटीस बजावली' असा आरोप याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात केला होता. जवळपास एक लाख दहा हजार कोटी रुपये खर्चाच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालं होतं. त्यानुसार महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये जवळपास 1400 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यापैकी सुमारे एक हजार 120 हेक्टर जमीन ही खासगी मालकीची आहे.

महत्त्वाच्या बातम्या

जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget