एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईतील कलानगरची वाहतूक कोंडी सुटणार, प्रस्तावित उड्डाणपूलाला हिरवा कंदील
हायकोर्टानं हिरवा कंदिल दिल्यामुळे एमएमआरडीएकडून साधारणतः येत्या वर्षभरात हा उड्डाणपूल पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वांद्रे येथील नंदादीप उद्यानानजीक असलेल्या सुमारे 14 तिवरांच्या झाडं तोडण्याबाबतची (सुमारे 0.0484 हेक्टर) परवानगी मिळविण्यासाठी एमएमआरडीएने हायकोर्टात याचिका केली होती
मुंबई : मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या आणि वाहतुकीच्या दृष्टीने सतत डोकेदुखी ठरणाऱ्या कलानगर जंक्शनवरची वाहतूक कोंडी लवकरच दूर होणार आहे. वांद्रे-वरळी सीलिंक आणि पूर्व-पश्चिम द्रुतगती महामार्गांना जोडणारा प्रस्तावित उड्डाणपूल बांधण्यासाठी तिवरांची झाडे हटवण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे.
हायकोर्टानं हिरवा कंदिल दिल्यामुळे एमएमआरडीएकडून साधारणतः येत्या वर्षभरात हा उड्डाणपूल पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कलानगर भागातील वाढत्या वाहतूक कोंडीला या उड्डाणपूलाचा पर्याय प्राधिकरणकडून तीन वर्षांपूर्वीच देण्यात आला आहे. याबाबत आवश्यक असलेल्या सर्व प्रशासकीय मंजुरींबरोबर सागरी किनारा नियमन प्राधिकरणची परवानगीही मिळाली आहे.
वांद्रे येथील नंदादीप उद्यानानजीक असलेल्या सुमारे 14 तिवरांच्या झाडं तोडण्याबाबतची (सुमारे 0.0484 हेक्टर) परवानगी मिळविण्यासाठी एमएमआरडीएने हायकोर्टात याचिका केली होती. न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती संदिप शिंदे यांच्या खंडपीठाने मंगळवारी ही परवानगी दिली आहे.
वाढत्या वाहतुकीमुळे अशाप्रकारच्या मार्गांची अत्यंत आवश्यकता आहे. यामुळे वाहतुकीचे नियोजन होण्यास मदत मिळू शकते, असं मत न्यायालयाने नोंदवलं. कटाई केलेल्या तिवरांची झाडं गोराई इथं पुनर्रोपित करण्याची तयारीही प्राधिकरणच्या वतीने दर्शवण्यात आली आहे. यासाठी गोराई येथे जमिनही निश्चित करण्यात आली असून याबाबत वन संरक्षण कायद्यानुसार प्राथमिक तरतुदींची पूर्तता केल्याचेही प्राधिकरणकडून हायकोर्टात सांगण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण
Advertisement