(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लॉकडाऊन काळात गरोदर महिलांच्या मदतीसाठी 'हौसला' उपक्रम
लॉकडाऊनच्या काळात गर्भवती महिलांना रुग्णालयात पोहचवण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. यासाठी काहीतरी केलं पाहिजे, या संकल्पनेतून पिंपरी चिंचवड शासकीय रुग्णलायत काम करणाऱ्या डॉ. राहुल इंगळे आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून 'हौसला' उपक्रम सुरू केला.
मुंबई : राज्यात आणि देशात लॉकडाऊन लागू होऊन दीड महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. या दरम्यान अनेकांना अनेक अडचणींना सामोरे जाव लागतंय. त्यात कोरोनाच्या संकटात काही गर्भवती महिलांची वेळेवर वाहन, अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने रुग्णालयात जाण्याआधीच प्रसूती झाली. त्यामुळे अशा बिकट परिस्थितीत गर्भवती महिलांना एक आधार देण्यासाठी एक मदत त्यांच्यापर्यंत पोहचावी यासाठी 'हौसला' उपक्रम राज्यभर काही डॉक्टर्स आणि स्वयंसेवकांनी मिळून सुरू केला. काय आहे हा उपक्रम आणि कशी मदत केली जाते यावर एक नजर टाकूया.
लॉकडाऊनमध्ये अनेक गोष्टी वेळेवर उपलब्ध होणे कठीण होऊन बसलं आहे. त्यातच अनेक गरोदर महिलांना रुग्णालयात जाण्यासाठी वाहन, अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने कधी रस्त्यात तर कधी घरी प्रसुती झाल्याच्या अनेक केसेस गेल्या काही दिवसात समोर आल्या आहेत. त्यामुळे आपण त्यांना रुग्णालयात पोहचवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, या संकल्पनेतून पिंपरी चिंचवड शासकीय रुग्णलायत काम करणाऱ्या डॉ. राहुल इंगळे आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून 'हौसला' उपक्रम सुरू केला. यामध्ये गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी रुग्णलयात पोहचवून तिच्यावर पुढील उपचार करायचं असं ठरवलं.
जेव्हा कोरोनाच्या संकटात अशाप्रकारे 24 तास काम करायचं ठवरलं. तेव्हा त्यांनी एक फेसबुक पेजद्वारे ज्याला या उपक्रमात काम करायचे आहे त्याने #yehhausala पोस्ट करण्यास सांगितले. मागील 2 आठवड्यापासून या उपक्रमात अनेकांनी सहभाग घेतला असून जवळपास 500 महिला आणि पुरुष स्वयंसेवक राज्याच्या विविध जिल्ह्यातून मदतीसाठी समोर आले आहेत. हा सगळा प्रतिसाद पाहता राज्यातल्या 6 विभागानुसार व्हॉट्सअॅप ग्रुप करून जवळपासच्या गर्भवती महिलांना दवाखाण्यात पोहचवण्याचे काम केलं जात आहे.
पुणे, औरंगाबाद, मुंबई, अमरावती, नागपूर, लातूर अशा 6 विभागात या टीम विभागल्या गेल्या असून मागील आठवडाभरात 15 गरोदर महिलांना या सर्वांनी मदत केली आहे. अनेक ठिकाणी खेडेगावात, तालुका ठिकणी लॉकडाऊनमुळे रस्ते बंद आहेत. अशा ठिकाणी ही वैद्यकीय मदत अत्यंत मोलाची ठरत आहे. त्यामुळे तुम्ही अडचणीत असाल आणि गरोदर महिलेला मदतीची गरज असेल तर नक्की हौसला ग्रुपची मदत घेण्यासाठी 9356186491, 7715861763 या क्रमांकावर व्हॉट्सअपवर मेसेज करा.
अशारीतीने कोरोनाच्या संकटात लॉकडाऊन आणि त्यात गरोदर महिलेला होणार त्रास, त्यांचा जीवाचा धोका कमी करण्यासाठी वेळेत उपचार आणि रुग्णलयात प्रसुती होण्यासाठी सुरू केलेली ही मदत अनेकांसाठी मोलाची आणि आयुष्यभर न विसरता येणारी असणार आहे.