एक्स्प्लोर
एकाच मांडवात दोन वधूंशी विवाह, अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा
पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वसा सुतारपाडा गावात राहणाऱ्या संजय धाडगा हा तरुण एकाच मांडवात दोन वधूंशी विवाह करणार आहे.

पालघर : पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वसा सुतारपाडा गावात राहणाऱ्या संजय धाडगा हा तरुण एकाच मांडवात दोन वधूंशी विवाह करणार आहे. 22 एप्रिल 2019 रोजी हा अनोखा विवाहसोहळा पार पडणार आहे. लग्नाची पत्रिका मिळाल्यापासून सुतारपाड्यातील प्रत्येक घरात केवळ संजय धाडगाच्या लग्नाचीच चर्चा सुरु आहे. संजयच्या घरी सध्या त्याच्या लग्नाची तयारी सुरु आहे.
रिक्षाचालक असलेल्या संजयचे 10 वर्षांपूर्वी बेबी नावाच्या एका तरुणीशी सूत जुळले. त्यानंतर हे दोघे एकत्र राहून संसार करु लागले. त्यानंतर काही वर्षांनी संजयचे रिना नावाच्या एका मुलीवर प्रेम जडले. त्यानंतर संजय, रीना आणि बेबी हे तिघेजण लग्न न करता एकाच घरात राजीखुशी राहू लागले. सध्या बेबीला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन आपत्ये आहेत. तर रीनाला एक मुलगी आहे.
पालघरमधल्या अनेक आदिवासी वस्त्यांमध्ये आर्थिक परिस्थितीमुळे अनेक जोडपी लग्न न करताच संसार करतात. अनेक जोडपी उतारवयात लग्न करतात, तर काहीजण मुलंबाळं झाल्यानंतर लग्न करतात. संजयलादेखील 8-10 वर्षांपूर्वी लग्न करता आले नसल्यामुळे त्याने आत्ता लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
लग्नपत्रिका पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
अहमदनगर
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
