MNS : मनसेचा इशारा, एअरटेलकडून माफीनामा; मनसेच्या इशाऱ्यानंतर गुजरातीमधील जाहिरात बंद
Airtel Gujarati Advertise In Mumbai : एअरटेलकडून चालवण्यात येणाऱ्या गुजराती जाहिरातीविरुद्ध मनसेने आवाज उठवल्यानंतर अखेर ती जाहिरात बंद करण्यात आली आहे.
मुंबई : मनसेच्या तक्रारीनंतर अखेर एअरटेलची (Airtel) गुजराती (Gujarati) भाषेतील जाहिरात एअरटेल कंपनीकडून बंद करण्यात आली आहे. मनसेकडून गुजराती भाषेतील ही जाहिरात बंद करण्यासाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. पण अखेर एअरटेलकडून ती जाहिरात बंद करण्यात आली आहे. तर जाहिरातीमध्ये मराठी भाषेला स्थान न मिळाल्याने मनसे आक्रमक झाली होती. दरम्यान मनसेचे आक्रमक भूमिकेनंतर एअरटेलकडून ती जाहिरात बंद केली गेली.
याचसंदर्भात मनसेकडून काही सवाल देखील उपस्थित करण्यात आले होते. एका सोशल मीडियापोस्टच्या माध्यमातून मनसेने हे सवाल उपस्थित केले होते. यावेळी मनसेचे म्हटलं की, हे मुद्दामहून सुरु आहे का ? महाराष्ट्रात मराठी राजभाषेला प्राधान्य द्यावं हे माहित असूनही कोट्यवधींच्या जाहिरातीमध्ये मराठीला डावलण्याचा खोडसाळपणा का केला जातो ? स्वतः दिल्लीच्या सिंहासनावर बसायचं आणि मराठी माणसाला भाषिक, जातीय अस्मितेसाठी कायम लढवत ठेवायचं असा मनसुबा आहे का?
नेमकं प्रकरण काय?
एअरटेल कंपनीकडून सोशल मीडियावर सिम कार्ड विक्री आणि एअरटेल स्विच जाहिरातीसाठी गुजराती भाषेचा वापर केला जात होता. महाराष्ट्रात जाहिरात केली जात असताना मराठीला डावलून गुजराती भाषेचा वापर होत असल्याने मनसे आक्रमक झाली होती. मनसेने नेते अखिल चित्रे आणि पदाधिकाऱ्यांनी मालाड येथील एअरटेल कार्याला भेट देऊन ही जाहिरात तातडीने बंद करण्याची आणि मराठी भाषेत जाहिरात करण्याची मागणी केली होती. दरम्यान मनसेचे आक्रमक भूमिकेनंतर एअरटेलकडून ती जाहिरात बंद केली गेली.
मनसेकडून आंदोलनाचा इशारा
ती जाहिरात बंद करण्यासाठी एअरटेलकडून आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला होता.तसेच मनसेचे नेते अखिल चित्रे यांना एअरटेलवर ताशेरे ओढले होते. यावेळी बोलताना अखिल चित्रे यांनी म्हटलं होतं की, मुंबईत गुजराती भाषिक असल्याचा एअरटेलला वारंवार साक्षात्कार होतोय असं दिसतंय. त्यामुळे कधी बिल गुजराती भाषेत दिलं जातंय तर कधी जाहिरात केली जातेय. या माध्यमातून सातत्याने गुजराती भाषा लादली जातेय. गुजरातमध्ये मराठी भाषेत जाहिरात केली जाणार का? असा सवाल देखील यावेळी त्यांनी उपस्थित केला होता.
जाहिरात बंद करण्याची एअरटेलची ग्वाही
मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी ही सवाल उपस्थित केल्यानंतर एअरटेलकडून माफीनामा देखील देण्यात आला. तर गुजराती भाषेतील जाहिराती बंद करणार असल्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर आता एअरटेलकडून ही जाहिरात बंद करण्यात आली आहे.
हेही वाचा :