एक्स्प्लोर

MNS : गुजरातमध्ये मराठी जाहिरात देणार का?, मनसेचा Airtel ला सवाल, मुंबईतील कार्यालयात धडक, एअरटेलचा माफीनामा

Airtel Gujarati Advertise In Mumbai : मनसेच्या इंग्यानंतर एअरटेलने गुजराती भाषेतील जाहिरात मागे घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. 

मुंबई : मुलुंडमध्ये मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा नाकारणे आणि कांदिवलीतील मराठी महिलेचा गाळा गुजराती व्यापाऱ्याने हडप केल्याच्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा मराठी भाषिक आणि मराठी माणसांचा मुद्दा चर्चेत आला आहे. गुजराती पाट्यांवरुन आधीच मुंबईमध्ये वाद सुरू असताना आता एअरटेलच्या गुजराती प्रेमामुळे मनसे आक्रमक झाल्याचं दिसून आलं. महाराष्ट्रात गुजराती भाषेत जाहिराती (Airtel Gujarati Advertise In Mumbai) करता, गुजरातमध्ये मराठी भाषेत जाहिराती देणार का? असा सवाल मनसेच्या (Malad MNS) कार्यकर्त्यांनी केला. मनसेच्या धडक मोर्चानंतर एअरटेलने माफीनामा देत या जाहिराती मागे घेणार असल्याची ग्वाही दिली. 

एअरटेलची गुजराती भाषेत जाहिरात आणि मनसेचा धडक मोर्चा 

एअरटेलने गुजराती भाषेत जाहिरात केल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मालाडच्या कार्यालयावर मोर्चा काढला. मनसेचे विद्यार्थी संघटनेचे नेते अखिल चित्रे, सतीश नारकर यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी मालाड पश्चिमेकडे भारती एअरटेल कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त देखील तैनात केला होता. यावेळी आंदोलकांनी एअरटेल कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा आग्रह धरल्यामुळे काही काळ पोलिसांशी बाचाबाची देखील झाली. यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी एअरटेल कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना निवेदन देऊन माफी मागण्यास सांगितले असून गुजराती भाषेतील जाहिरात देखील हटवण्याची मागणी केली आहे.

मग यांच्या काचा फुटणार

मनसेचे अखिल चित्रे म्हणाले की, मुंबईत गुजराती भाषिक असल्याचा एअरटेलला वारंवार साक्षात्कार होतोय असं दिसतंय. त्यामुळे कधी बिल गुजराती भाषेत दिलं जातंय तर कधी जाहिरात केली जातेय. या माध्यमातून सातत्याने गुजराती भाषा लादली जातेय. गुजरातमध्ये मराठी भाषेत जाहिरात केली जाणार का? मनसेच्या मोर्चानंतर आता एअरटेलने माफीनामा दिला असून गुजराती भाषेतील जाहिराती बंद करणार असल्याची ग्वाही दिली आहे. यांना इतर भाषिकांचा पुळका असेल तर तिकडे जावं. महाराष्ट्र नवनिर्मान सेनेने आवाहन केलं तर फायद्यापेक्षा तोटाच होणार, यांच्या काचा फुटणार. 

हे मुद्दामहून सुरू आहे का? 

मनसेने यासंबंधी सोशल मीडियावर एक पोस्ट करत काही प्रश्न विचारले आहेत. त्यामध्ये म्हटलंय की, हे मुद्दामहून सुरु आहे का ? महाराष्ट्रात मराठी राजभाषेला प्राधान्य द्यावं हे माहित असूनही कोट्यवधींच्या जाहिरातीमध्ये मराठीला डावलण्याचा खोडसाळपणा का केला जातो ? स्वतः दिल्लीच्या सिंहासनावर बसायचं आणि मराठी माणसाला भाषिक, जातीय अस्मितेसाठी कायम लढवत ठेवायचं असा मनसुबा आहे का?

 

 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Samadhan Sarvankar On Shivsena UBT Vishakha Raut: व्यवसाय मजूर-घरकाम...बाप रे?; विशाखा राऊतांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर समाधान सरवणकरांचा आणखी एक आरोप
व्यवसाय मजूर-घरकाम...बाप रे?; विशाखा राऊतांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर समाधान सरवणकरांचा आणखी एक आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
BMC Fellowship Programme: 61 हजार 500 रुपये मानधनासाठी तरुणाईची गर्दी; 50 जागांसाठी अडीच हजार तरुणांची रुची, BMC फेलोशिपला डॉक्टर, इंजिनिअरसह उच्चशिक्षितांचाही प्रतिसाद
61 हजार 500 रुपये मानधनासाठी तरुणाईची गर्दी; अवघ्या 50 जागांसाठी अडीच हजार तरुणांची रुची, महापालिका फेलोशिपला डॉक्टर, इंजिनिअरसह उच्चशिक्षितांचाही प्रतिसाद

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Embed widget