(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gram Panchayat Election 2021 Results: ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालावर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालावर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रीया दिली आहे.
मुंबई : राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. यात महाविकास आघाडीतल शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पुरस्कृत पॅनेलला घवघवीत यश मिळताना दिसत आहे. ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालावर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालातून पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास सिद्ध झाला असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांना चांगले यश पाहायला मिळत आहे. आताच्या घडीला सर्वाधिक ग्रामपंचायत शिवसेनेकडे असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दोन नंबरवर भाजपने बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, हा महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास पुन्हा सिद्ध झाला असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
मतमोजणीच्या ठिकाणी या गोष्टींना मनाई मतमोजणीच्या संपूर्ण परिसरात शासकीय अधिकारी आणि कर्मचारी वगळता इतर कोणत्याही व्यक्तींना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. सोबत तंबाखूजन्य पदार्थ, आगपेटी, लायटर, ज्वालाग्राही पदार्थ अथवा कोणतेही घातक पदार्थ किंवा वस्तू मतमोजणीच्या ठिकाणी घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात निवडणूक संबंधित अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, उमेदवारांचे दोन अधिकृत प्रतिनिधी आणि पासधारक व्यक्ती यांच्या शिवाय कोणालाही प्रवेश करण्यास परवानगी नसणार आहे.