राज्यातील सद्यस्थितीची माहिती राज्यपालांनी राष्ट्रपतींना दिली पाहिजे : सुधीर मुनगंटीवार
गृहमंत्री पोलिसांना 100 कोटींची खंडणी वसूल करायला सांगतात यांची उच्चस्तरिय चौकशी करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी भाजपच्या वतीने सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
मुंबई : राज्यात सुरु असलेल्या घडामोडींवर भाजप नेते सुधीर मनुगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. राष्ट्रपती राजवट लागू करावी ही आमची मागणी नाही. मात्र राज्यपालांनी सध्याच्या परिस्थितीत हस्तक्षेप करावा अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली. राज्यपाल महोदयांनी राज्यातल्या सत्य परिस्थितीवर आधारित घटनेत नमून केलेल्या तरतुदींच्या आधारे एक अहवाल राष्ट्रपतींना सादर करावा. मुख्यमंत्री आणि मुख्यसचिव यांनीही सत्य कथन असलेला अहवाल लिहावा असं सुधीर मुनगंटीवार यांनी मागणी केली.
गृहमंत्री पोलिसांना 100 कोटींची खंडणी वसूल करायला सांगतात यांची उच्चस्तरिय चौकशी करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी भाजपच्या वतीने सुधीर मुनगंटीवार यांनी केली. राज्य सरकार घटनेनुसार कृती करण्यास असमर्थ असेल. तर सत्य माहिती राज्यपालांनी राष्ट्रपती यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे. आम्ही राज्यपालांना परवा भेटायला जाणार आहोत. राज्यपाल महोदयांनी राज्यातील घडामोडींचा अहवाल राष्ट्रपतींना पाठवावा अशी विनंती करणार आहोत, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.
Anil Deshmukh : अनिल देशमुख यांची खुर्ची जाणार की राहणार? आज होणार महत्वाचा निर्णय
परमबीर सिंह यांच्या पत्राकडे गंभीरतेने पाहण्याची गरज आहे, मात्र ते खुप हलक्यात घेतलं जात आहे. पोलीस यंत्रणेचे मनोबल खच्चीकरण झालं तर कायदा सुव्यवस्था राखणे कठीण होऊन जाईल. परमबीर सिंह यांनी पत्रात केलेल्या आरोपांबाबत उल्लेख असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनीही याचं खंडण केलेलं नाही. त्यामुळे शंका आणखी बळावत आहे, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं. पोलीस विभागातील मंत्री अधिकाऱ्यांना चुकीची कामं सांगत असतील तर त्यांनी राज्यापालांकडे तक्रारी केल्या पाहिजेत.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे: संजय राऊत
महाविकास आघाडी सरकारचे नेते सचिन वाझेची वकीली करत होते. त्यामुळे सरकारने लोकहिताची कामं करावीत. मात्र पदाचं आणि सत्तेचं कवचकुंडल सचिन वाझेच्या अवतीभवती निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे असं का याबाबत शंका वाढते, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं.