एक्स्प्लोर
सीएसटी-कुर्ला हार्बर लाईन हळूहळू पूर्वपदावर
मुंबई : दिवसभर रखडलेली हार्बर लोकल सेवा तब्बल 14 तासांच्या खोळंब्यानंतर हळूहळू पूर्वपदावर येते आहे. रात्री पावणे नऊ वाजता सीएसटी ते पनवेल दरम्यान पहिली लोकल रवाना झाली. त्यामुळे उशिरा का होईना धडपडत घरी पोहोचलेल्या प्रवाशांना उद्याच्या प्रवासासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. असं असलं तरी हार्बरमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवासांची सीएसटी स्टेशनवर मोठी गर्दी पाहायला मिळते आहे.
सकाळी साडे पाचच्या सुमारास गुरू तेग बहाद्दूर ते वडाळादरम्यान मालगाडीचे चार डबे घसरले. त्यानंतर हार्बर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. मालगाडीचे डबे हटवण्यात पूर्ण दिवस वाया गेला. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप झालाच पण संध्याकाळी घरी जाणाऱ्यांचीही त्रेधा तिरपीट उडाली.
सकाळी साडे पाचच्या सुमारास गुरू तेग बहाद्दूर ते वडाळादरम्यान मालगाडीचे चार डबे घसरले होते. त्यानंतर हार्बर लोकलचा उडालेला खोळंबा 12 हून अधिक तास कायम होता.
धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठिकाणी अपघात घडला तिथं रेल्वे रुळाचा तुकडा आढळला आहे. अपघातानंतर रेल्वे रूळ तुटला की रुळ तुटल्यामुळं अपघात घडला यावर भाष्य करायला रेल्वे अधिकारी तयार नाही. त्यामुळे हा घातपाताचा तर प्रकार नाही ना अशी शंका उपस्थित केली जाते आहे.
दरम्यान, कुर्ला ते पनवेल सेवा सुरळीत सुरु होती. त्यामुळे हार्बरच्या प्रवाशांना दिलासा मिळाला. शिवाय, कुर्ला ते पनवेल आणि कुर्ला ते वाशी या मार्गावर गाड्या सोडल्याने प्रवाशांना फायद्याचं ठरलं. सोबत अनेक प्रवाशी पनवेलच्या दिशेने जाण्यासाठी ट्रान्स हार्बरचा मार्ग अवलंबतना दिसले.
मालगाडीचे डबे घसरले आहेत. ट्रॅकचा प्रॉब्लेम असल्याचं प्रथमदर्शिनी दिसतं आहे. घातपाताचा कोणताही संशय नाही. मात्र, चौकशीनंतरच आणखी ठोसपणे सांगता येईल, असेही नरेंद्र पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement