एक्स्प्लोर

Ghatkopar Hoarding Falls: अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर

Ghatkopar Hoarding Falls: या घटनेमुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 75 जण जखमी झाले आहेत. जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Ghatkopar Hoarding Falls: मुंबईत सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. या वादळामुळे घाटकोपर (Ghatkpor) येथील छेडानगर भागात पूर्व द्रुतगती महामार्गाजवळच्या पेट्रोल पंपावर (Ghatkopar Petrol Pump) अजस्त्र होर्डिंग फाउंडेशनसह उखडून कोसळले. या घटनेमुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 75 जण जखमी झाले आहेत. जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांनी या पेट्रोल पंपावर आसरा घेतला होता. मात्र त्याचवेळी पंपालगत उभारलेला एक अवाढव्य होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे थेट पेट्रोल पंपावर कोसळला. या भीषण अपघातामध्ये अनेक गाड्यांचा देखील चुरडा झाला आहे. होर्डिंग आणि पंपाचे छत एकत्रितपणे पेट्रोल पंपावर कोसळल्याने  त्याखाली वाहने दाबली गेली. या घटनेनंतर सदर होर्डिंग हे अनधिकृत असल्याचं समोर आलं.

मुंबई महानगरपालिका डिझास्टर अॅक्ट अंतर्गत संबंधित कंपनी आणि रेल्वे प्राधिकरणाविरोधात गुन्हा दाखल केला. (120 बाय 120 फुटाचा हा बॅनर होता) राज्य सरकारच्या जागेत हा अनधिकृत बॅनर लावल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. याच्या आजूबाजूला तीन अजून मोठे अनाधिकृत होल्डिंग बॅनर आहे त्याच्यावर देखील पालिका कारवाई करत आहे. मात्र याचदरम्यान नवीन माहिती समोर येत आहे. घाटकोपर येथे याच जागेवर अनधिकृत चार महाकाय जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत. ते फलक दिसावे म्हणून आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग केल्याचेही उघडकीस आले आहे. याप्रकरणी प्रशासनाने फेब्रुवारीत घाटकोपरच्या पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा करण्याचे निर्देश-

दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख देण्याचे जाहीर केले असून जखमींवर सरकारी खर्चाने सर्व उपचार करण्यात येतील. तसेच अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी मुंबईतील सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक होर्डिंग्ज तात्काळ हटविण्याचे निर्देश दिले आहेत.

अनधिकृत होर्डिंग्जचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित-

मुंबई महापालिकेकडून 40 बाय 40 स्क्वेअर फुट होर्डिंग परवानगी असताना तब्बल 120 स्क्वेअर फुटाचे अनधिकृत होर्डिंग्ज लावण्यात आलं होतं. त्यामुळे ही परवानगी दिली तरी कोणी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पंपाच्या ठिकाणी ज्वलनशील पदार्थाचा साठा असल्याने मदतकार्यात अडथळा येत आहे. त्यामुळे गॅस कटरचा पर्याय सावधपणे वापरला जात आहे. महाकाय होल्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं आहे ते अनधिकृत असल्याचे समोर आलं आहे. त्या होर्डिंग्जला महापालिकेकडून नोटीस देण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईमधील हजारोंनी असलेल्या अनधिकृत होर्डिंग्जचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget