एक्स्प्लोर
Sanjay Shirsat Row: 'त्यांनी स्वतः विनंती केली', उपोषणकर्त्याला घरी बोलावण्यावर Sanjay Shirsat यांचे स्पष्टीकरण
पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी कन्नड (Kannad) येथील उपोषणकर्ते संदीप सेठी (Sandeep Sethi) यांना घरी बोलावून उपोषण सोडल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. 'त्यांनी स्वतः विनंती केली आमच्या तहसीलदारांना की मला उपोषण पालकमंत्र्यांच्या हस्ते सोडायचंय आणि मला संभाजीनगरला जायचंय,' असे स्पष्टीकरण संजय शिरसाट यांनी दिले आहे. अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी संदीप सेठी हे नऊ दिवसांपासून उपोषणाला बसले होते. प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णवाहिकेतून शिरसाट यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानी नेण्यात आले, जिथे त्यांनी उपोषण मागे घेतले. या प्रकारामुळे शिरसाट यांच्यावर असंवेदनशीलतेचा आरोप होत असून, विरोधकांनी त्यांच्यावर सत्तेची मस्ती असल्याची टीका केली आहे. मात्र, आपण काहीही चुकीचे केले नाही आणि उपोषणकर्त्याच्या विनंतीचा मान ठेवल्याचे शिरसाट यांनी म्हटले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















