एक्स्प्लोर

Asrani Passed Away: शोलेतील 'अंग्रेजो के जमाने के जेलर' अजरामर करणाऱ्या कॉमेडियन असरानी यांचं निधन, वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

Asrani Passed Away : बॉलिवडूमधील लोकप्रिय विनोदी अभिनेते असरानी यांचं वयाच्या 84 व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या पाच दिवसांपासून रुग्णालयात होते.

मुंबई : बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते विनोदी अभिनेते असरानी (Asrani) यांचं वयाच्या 84 व्या वर्षी निधन झालं आहे. ते गेल्या पाच दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते. असरानी यांचं पूर्ण नाव गोवर्धन असरानी होतं. 1 जानेवारी 1941 ला त्यांचा जन्म जयपूरमध्ये झाला. 1960 ला त्यांचं करिअर सुरु झालं, त्यांनी 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांचं विनोदाचं टायमिंग आणि अनोख्या शैलीमुळं ते लोकप्रिय ठरले. शोले चित्रपटातील त्यांचं  अंग्रेजो के जमाने के जेलर हा डालयॉग असणारी जेलरची भूमिका लोकप्रिय ठरली. खट्टा मीठा, चुपके चुपके या चित्रपटातील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या.  

असरानी यांनी सेंट झेविअर स्कूल, जयपूरमधून शिक्षण घेतल्यानंतर राजस्थान कॉलेजमध्ये पदवी पूर्ण केली. त्यानंतर असरानी यांनी रेडिओ आर्टिस्ट म्हणून काम केलं. असरानी यांच्या पत्नीचं नाव मंजू बन्सल इरानी आहे. असरानी यांनी 2004 मध्ये काँग्रेसचं सदस्यत्व घेतलं होतं. असरानी यांनी सिनेमा क्षेत्रात येण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागला, त्यांनी गुड्डी या चित्रपटातून पदार्पण केलं. तो सिनेमा देखील हिट ठरला. 

असरानी एका मुलाखतीत म्हणाले होते की त्यांना लोक व्यावसायिक अभिनेता समजत नव्हते, त्यात गुलजार देखील होते.  ते म्हणाले होते, गुलजार साहेब यांनी म्हटलं होतं नाही नाही, ते मला व्यावसायिक अभिनेते समजत नव्हते, काही लोक चेहरा कसा आहे. मात्र जेव्हा अभिनयाची छाप पाडली त्यानंतर माग वळून पाहण्याची संधी मिळाली नाही, असं असरानी म्हणाले.  

चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर असरानी यांच्याबद्दल बोलताना म्हणाले की,एक अतिशय मोठी यशस्वी कारकीर्द असलेला हा कलाकार होता.ज्यावेळी पुण्याच्या एफटीआय कलाकार हिंदी चित्रपट सृष्टीत आले 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला, त्यातील असरानी हे विनोदाचं उत्तम टायमिंग असणारे अभिनेते होते. ऋषिकेश मुखर्जी यांच्यासारख्या कल्पक दिग्दर्शकाचा विश्वास संपन्न करणारा अभिनेता असरानी होते, असं दिलीप ठाकूर म्हणाले. 

अभिनयाबरोबर असरानी यांनी काही चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं. चला मुरारी हिरो बनने, सलाम मेमसाब, हम नही सुधरेंगे, दिल ही तो है या नावाचा सिनेमा दिग्दर्शित केला होता. त्यात जॅकी श्रॉफचा डबल रोल होता आणि दिव्या भारती आणि शिल्पा शिरोडकर अशा दोन अभिनेत्री त्यात होत्या. गुजराती सिनेमांचं दिग्दर्शन केलं होतं. गेल्या दशकात असरानी यांनी मराठी सिनेमात काम केलं होतं, अशी माहिती दिलीप ठाकूर यांनी असरानी यांच्या कारकि‍र्दीबाबत दिली. 

शोलेतील त्यांचं काम सर्वज्ञात आहे.उत्तम बुद्धिमत्ता असलेला आणि  चित्रपट व्यवसायाची ओळख  असलेला कलाकार म्हणून असरानी यांच्याकडे पाहता येतं. त्यांनी स्वत :ला अपडेट ठेवलं.राजेश खन्नांच्या चित्रपटात असरानी यांना अनेकदा पाहिलं आहे. राजेश खन्ना आणि त्यांची जोडी अजनबी आणि अनुरोधमध्ये पाहायला मिळते. 1970 आणि 1980 च्या दशकातील आघाडीच्या दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं, अशी भावना चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांनी व्यक्त केली.   
    

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget