एक्स्प्लोर
बदलापुरात अपहरण करुन अल्पवयीन मुलीवर गँगरेप
पीडित मुलीला फिरायला जायच्या निमित्ताने हे तिघे बदलापूर-पनवेल हायवेवरील एका डोंगरावर घेऊन गेले आणि तिथे तिघांनीही तिच्यावर अत्याचार केले.
ठाणे : अल्पवयीन मुलीवर तिच्याच परिसरात राहणाऱ्या तीन तरुणांनी अपहरण करुन सामूहिक अत्याचार केला. बदलापुरात ही घटना घडली.
पीडित अल्पवयीन मुलगी बदलापूरच्या शिरगाव आपटेवाडी परिसरात राहणारी आहे. तिच्याच परिसरात राहणाऱ्या आणि तिच्या ओळखीच्या असलेल्या 24 वर्षीय रवींद्र सांजेकर, 18 वर्षांच्या अहमद खान यांच्यासह आणखी एका अल्पवयीन आरोपीने हे दुष्कृत्य केलं.
पीडित मुलीला फिरायला जायच्या निमित्ताने हे तिघे बदलापूर-पनवेल हायवेवरील एका डोंगरावर घेऊन गेले आणि तिथे तिघांनीही तिच्यावर अत्याचार केले. या घटनेनंतर आरोपी पळून गेले, तर घरी काय सांगायचं? या भीतीने मुलगी मात्र दोन दिवस घरावजळच्या एका बागेत बसून होती.
मुलगी बेपत्ता झाल्यानं घरच्यांनी पोलीस तक्रार केली आणि पोलिसांनी अखेर मुलीला शोधून काढलं. यानंतर मुलीनं आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितल्यावर पोलिसांनी तातडीनं तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. यापैकी दोन सज्ञान आरोपींना न्यायालयानं 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून एका अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement