एक्स्प्लोर
बिबट्याची कातडी विकणारी टोळी जेरबंद
वालीव पोलिसांच्या ताब्यात असणारे हे दोघेजण वन्य जीवांची शिकार करणारे सराईत गुन्हेगार आहेत. गजानन कृष्णा देसाई आणि अर्जुन तायडे असे या दोघांची नावं आहेत. हे दोघेही मिरारोडचे रहिवाशी आहेत. अशोक येद्रे आणि प्रवीण वाझे हे दोन त्याचे साथीदार फरार आहेत.
वसई : बिबट्याची कातडी विकण्यासाठी आलेल्या टोळीचा वसईत भांडाफोड करण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे. पालघर गुन्हे प्रतिबंधक पथकाने या टोळीतील 2 जणांना जेरबंद करण्यात यश मिळविले आहे, तर 2 जण फरार झाले आहेत. याबाबत वालीव पोलीस ठाण्यात वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9,39,48 (A) 49, 51, गुन्हा दाखल केला आहे.
वालीव पोलिसांच्या ताब्यात असणारे हे दोघेजण वन्य जीवांची शिकार करणारे सराईत गुन्हेगार आहेत. गजानन कृष्णा देसाई आणि अर्जुन तायडे असे या दोघांची नावं आहेत. हे दोघेही मिरारोडचे रहिवाशी आहेत. अशोक येद्रे आणि प्रवीण वाझे हे दोन त्याचे साथीदार फरार आहेत. फरार आरोपीमधील अशोक येद्रे हा ट्रॅव्हल्स एजंसीचा मालक आहे तर प्रवीण वाझे हा ट्रॅव्हल्स कर्मचारी आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील एका हॉटेलमध्ये हे आरोपी बिबट्याची कातडी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पालघर गुन्हे प्रतिबंधक पथकाला मिळाली होती. या माहितीवरून या पथकाने हॉटेलमध्ये सापळा लावला होता. Asi सुरेंद्र शिवदे या अधिकाऱ्यानं वेटरचा वेष परिधान करून आरोपीवर पाळत ठेवली होती. आरोपी डिस्कव्हर मोटारसायकल वरून हॉटेलमध्ये आल्याची माहिती मिळताच त्यांनी त्याच्यावर झडप टाकून पकडले. आरोपीची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे बिबट्याची कातडी त्यांना मिळून आली. त्या कातडीवर 2 गोळ्या लागल्याचे निशाण ही आहे.
मिळालेली कातडी ही 220 cm लांबी, 88 cm लांबीचे शेपूट, 27 cm लांबीचे पुढचे पाय, 33 cm लांबीचे मागचे पाय, आणि 97 cm ची छातीचा भाग आहे, 12 cm लांबीच्या 4 मिशा असल्याची ही कातडी आहे. वन्य जीवांची शिकार करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकणारी टोळी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यामुळे या बिबट्याची शिकार कुठे केली, कुणाला विकणार होते याचा पोलीस तपास करीत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
सोलापूर
भारत
Advertisement