(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ganesh Chaturthi 2021: लालबागचा राजा विराजमान, इथं घ्या 24 तास ऑनलाईन दर्शन
Ganesh Chaturthi 2021 : लालबागच्या राजाच्या( Lalbaugcha Raja ) विराजमान झाला आहे. गेल्या वर्षी कोव्हिड 19 संसर्गामुळे लालबागचा राजा सर्वजनिक गणेशोत्सव मंडळने 'आरोग्य उत्सव' साजरा केला होता.
मुंबई : लालबागच्या राजाच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. लालबागचा राजा (Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal)यंदा विराजमान झाला आहे. गेल्या वर्षी कोव्हिड 19 संसर्गामुळे लालबागचा राजा सर्वजनिक गणेशोत्सव मंडळने 'आरोग्य उत्सव' साजरा केला होता. यावर्षी मात्र राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व नियमांचे पालन करून गणेश उत्सव साजरा केला जाणार असल्याचे कार्याच्या मंडळाच्या बैठकीत ठरले. लालबागचा राजा चे ॲानलाईन दर्शन भाविकासाठी शुक्रवार 10 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते रविवार 19 सप्टेंबर 2021 सकाळी 7 वाजेपर्यंत 24 तास चालू राहिल. या उत्सवाचे थेट प्रक्षेपण मंडळाच्या अधिकृत सोशल मिडिया साईटवर उपलब्ध असेल.
Ganesh Chaturthi 2021: पंतप्रधान मोदी म्हणाले, गणपती बाप्पा मोरया, मराठीतून दिल्या खास शुभेच्छा
मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
www.lalbaugcharaja.com
मंडळाचे अधिकृत यूट्यूब चॅनल:
https://youtu.be/Yrfsd3NsGdQ
मंडळाचे अधिकृत फेसबुक पेज:
https://fb.me/e/1k0x7o4iC
मंडळाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट:
https://twitter.com/lalbaugcharaja
मंडळाचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट:
https://instagram.com/lalbaugcharaja
लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ यंदा आपलं 88 वा गणेशोत्सव सोहळा साजरा करत आहे. यंदा मंडळातर्फे शुक्रवार म्हणजेच, 10 सप्टेंबर 2021 ते रविवार 19 सप्टेंबर 2021 या कालावधीत साजरा होत आहे. 10 ऑगस्ट रोजी लालबागच्या राजाचा गणेश मुहूर्त पूजन अर्थात पाद्यपूजन सोहळा अत्यंत मांगल्यमय आणि पावित्र्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला होता. कोरोना संसर्ग निर्बंधांमुळे अत्यंत साधेपणाने आणि सुरक्षितपणे हा सोहळा पार पडला होता.
यंदा मुंबईच्या राजाची मूर्ती 22 फुटांऐवजी 3 फूट, गणेश मंडळाचा मोठा निर्णय
लालबागच्या राज्याच्या दर्शनाला होणारी गर्दी पहाता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं हा सोहळा जाहीरपणे न करता, काही मर्यादित कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केला होता. त्यामुळे गणेशभक्तांची होणारी गर्दी टाळता आली. दरवर्षी लालबागच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्यालाही गणेशभक्तांची मोठी गर्दी होते.
यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईतील मानाच्या गणपतींचे दर्शन ऑनलाईन पद्धतीनेच प्रयत्न
लालबागमधील प्रसिद्ध गणपती मंडळ लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने (Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal) गेल्या वर्षी राज्यावर कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा न करता आरोग्यसेवा साजरा केला होता.