एक्स्प्लोर

यंदा मुंबईच्या राजाची मूर्ती 22 फुटांऐवजी 3 फूट, गणेश मंडळाचा मोठा निर्णय

यंदा भाविकांना गणेश गल्लीच्या राजाचं अर्थात मुंबईच्या राजाचं भव्य रुप पाहता येणार नाही. कारण मुंबईच्या राजाची 22 फुटांची मूर्ती रद्द करुन 3 फुटांची मूर्ती बसवून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे.

मुंबई : मुंबईचा राजा अशी ओळख गणेश गल्लीच्या गणपतीची ओळख आहे. दरवर्षी विविध रुपातील आणि भव्य गणेश मूर्ती हे मुंबईच्या राजाची खासियत असते. परंतु यंदा गणेशभक्तांना मंडपात हे चित्र दिसणार नाही. मुंबईच्या राजाची 22 फुटांची मूर्ती रद्द करुन 3 फुटांची मूर्ती बसवून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे.

दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गणपती मंडळामध्ये चर्चा झाली होती. कोरोनाच्या संकटामुळे मंडळाने हा निर्णय घेतला असून लहान मूर्ती आणून उत्सवाची उंची वाढवणार असल्याची प्रतिक्रिया मंडळाचे सचिव स्वप्निल परब यांनी दिली.

1928 साली लालबाग सार्वजनिक गणेशत्सोवाची स्थापना करण्यात आली होती. यंदा या मंडळाचं 93वं वर्ष आहे.

मुंबई आणि गणेशोत्सवाचं खास नातं आहे. मुंबईत मोठ्या उत्साह गणेशोत्सव साजरा केला जातो. परंतु यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. कोरोना काळात गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. तसंच गणेशमूर्तीच्या उंचीवर मर्यादा आणण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.

गणेशगल्लीत असा साजरा होणार उत्सव! गेल्या अनेक वर्षांची परंपरा आणि मुंबईतलं सर्वात उंच मूर्ती बसवणारं मंडळ म्हणून गणेशगल्लीची ओळख आहे. दरवर्षी पाद्यपूजन सोहळ्याने याची सुरुवात होते. पण यंदा 22 फुटांची मूर्ती रद्द केल्याने पूजेसाठी तीन फुटांची मूर्ती बसवणार आहेत. गर्दी टाळण्यासाठी या मूर्तीचं दर्शन फक्त स्थानिकांनाच देण्यात येईल. जे मुंबईच्या राजाचे भक्त आहेत त्यांच्यासाठी ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात येईल. तसंच यंदा वर्गणी जमा न करता गणेशगल्लीत उत्सव साजरा होणार आहे.

अनेक वर्षांपासून गणेश गल्लीचा राजा अर्थात मुंबईच्या राजाची 22 फुटांची मनमोहक मूर्ती असते. प्रत्येक वर्षी इथे वेगवेगळ्या रुपातील बाप्पा दिसतो. केवळ भव्य मूर्तीच नाही तर मंडपातील देखावा पाहण्यासाठीही भाविक मोठी गर्दी करतात. परंतु यंदा गणेशभक्तांना मोठी मूर्ती पाहायला मिळणार नसली तरी उत्सवाचा उत्साह मात्र कायम असेल.

मुंबईचा राजा नेहमीच जपतो सामाजिक भान या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे, राज्यासमोर जे जे संकंट असतं त्यावेळेस हे मंडळ सरकारसोबत असतं. यावेळीही त्यांनी हा निर्णय घेऊन, आपण राज्य सरकारसोबत असल्याचं दाखवलं आहे. गणेशोत्सवात गणेशगल्लीतले देखावे पाहण्यासाठी अनेक भाविक येत असतात. दानपेटीत जे दान जमा होतं ते दान हे कधी भूकंपग्रस्तांसाठी, पूरग्रस्तांसाठी, अभ्यास किंवा आरोग्यासाठी वापरत असतात. त्यामुळे या मंडळाकडे नेहमीच सामजिक भान जपणारं मंडळ म्हणून पाहिलं जातं.

चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा रद्द गिरणगावातील 101व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ (चिंचपोकळीचा चिंतामणी) ने यंदा लोकभावनेचा विचार करुन तसंच सध्याची कोरोना परिस्थिती पाहता आणि पोलिसांवर असलेली जबाबदारी त्यांच्यावर गणेशोत्सवात अतिरिक्त ताण पडू नये म्हणून आगमन सोहळा रद्द करुन चिंतामणीच्या मंडपातच मूर्ती घडवण्याचा निर्णय घेतला आहे. मूर्तीच्या उंचीबाबत शासन जे निर्देश देईल त्यानुसार, मूर्ती बनवण्यात येईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष उमेश सिताराम नाईक यांनी दिली आहे. तसेच, मूर्ती जागेवर घडवण्यासाठी चिंतामणीच्या मूर्तीकार रेश्मा विजय खातू यांनी तयारी दर्शवली आहे.

सामाजिक भान जपत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करा : मुख्यमंत्री यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान ठेवून आणि समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर उत्सवाचं नवा आदर्श निर्माण करावा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळांना केलं. पुणे आणि इतर बऱ्याच ठिकाणच्या गणेश मंडळांनी यावर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबत निर्णय घेतला आहे. याबद्दल शासन जो निर्णय घेईल त्याला पूर्णपणे पाठिंबा आहे अशी ग्वाही राज्यातील गणेश मंडळांनी दिली.

संबंधित बातम्या

यंदाचा गणेशोत्सव सामाजिक भान जपत साधेपणाने साजरा करा, मुख्यमंत्र्यांचे गणेशोत्सव मंडळांना आवाहन

चिंतामणीचा आगमन सोहळा रद्द; शंभर वर्षांची परंपरा खंडित करुन मंडपातच साकारणार बाप्पा

महत्त्वाच्या बातम्या

सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Embed widget