एक्स्प्लोर
आता दक्षिण मुंबईत करा मोफत पार्किंग

मुंबई : दक्षिण मुंबईत महापालिकेच्या ‘ए’ विभागांतर्गत येणाऱ्या 39 वाहनतळांच्या बाबत निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने पुढील कंत्राटदाराची नियुक्ती होईपर्यंत या सर्व जागांवर मोफत पार्किंग घोषित करण्यात आली आहे. यामध्ये गेटवे ऑफ इंडियाजवळील पी. जे. रामचंदानी मार्ग, विधानभवन मार्ग, जमशेदजी टाटा मार्ग, विद्यापीठ मार्ग, हॉर्निमन सर्कल, जहांगीर आर्ट गॅलरी, एन. सी. पी. ए., मरीन ड्राईव्ह यांसारख्या परिसरातील वाहनतळांचा समावेश आहे. या सर्व 39 वाहनतळांच्या ठिकाणी साधारणपणे 7 हजार 146 वाहने पार्किंग करता येणे शक्य आहे. यामध्ये 4 हजार 924 चारचाकी तर 2 हजार 222 दुचाकी वाहनांचा समावेश आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
मुंबई
लाईफस्टाईल
कोल्हापूर























