एक्स्प्लोर

ठाणे मनपाने केले चार अधिकारी निलंबित, रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी ठरवले दोषी

गणेशोत्सवापासून ठाण्यात अंतर्गत रस्त्यांप्रमाणेच मुख्य रस्त्यांवर देखील प्रचंड प्रमाणात खड्डे पडल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर होऊन लांबच लांब रांगा लागल्याचे एबीपी माझाने निदर्शनास आणून दिले होते.

 ठाणे :रस्त्यावर वारंवार पडलेल्या खड्ड्यांमुळे टीकेचे धनी झालेल्या ठाणे महानगर पालिकेने अखेर आपल्या चार अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या चौघांवर आपल्या कामगिरी मध्ये दिरंगाई केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. कालच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलूंड टोल नाका ते घोडबंदर रोड आणि मुंबई-नाशिक हायवेवरील पडघा टोल नाक्या पर्यंत रस्त्यांच्या झालेल्या अवस्थेची पाहणी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर रात्रीच ठाणे महानगरपालिकेने आदेश काढून या चार जणांना निलंबित केले आहे. एबीपी माझा ने केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे पालिकेला अखेर कारवाई करावी लागल्याची प्रतिक्रिया समाज माध्यमांमध्ये उमटत आहे.

गणेशोत्सवापासून ठाण्यात अंतर्गत रस्त्यांप्रमाणेच मुख्य रस्त्यांवर देखील प्रचंड प्रमाणात खड्डे पडल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर होऊन लांबच लांब रांगा लागल्याचे एबीपी माझाने निदर्शनास आणून दिले होते. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अडचण निर्माण होऊन ठाण्यात एका तरुणाचा तर भिवंडीत आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना देखील घडली होती. त्यानंतर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना रस्त्यांचा पाहणी दौरा आयोजित करावा लागला होता. या दौऱ्यामध्ये प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी विविध सरकारी संस्थांच्या अधिकाऱ्यची खरडपट्टी देखील काढली होती आणि त्याच वेळी कामात दिरंगाई करणार्‍या अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.

पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर काल रात्रीच ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्तांनी आदेश काढले. या आदेशामध्ये उठळसर प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता चेतन पटेल, वर्तकनगर प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता प्रकाश खडतरे, लोकमान्य नगर सावरकर नगर प्रभाग समितीचे उप अभियंता संदीप सावंत आणि कनिष्ठ अभियंता संदीप गायकवाड अशा चार अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई केली. या आदेशामध्ये असे देखील म्हटले आहे की, सर्व यंत्रणा असून देखील, निधी उपलब्ध करुन दिला असून देखील, या चौघांनी आपल्या कामामध्ये दिरंगाई केली आणि निष्काळजीपणा केल्यानेच रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. मात्र केवळ ठाणे महानगरपालिके नाही तर एमएमआरडीए, एमएसआरडीसी आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaTop 25 : 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 5 जुलै 2024 : शुक्रवार : ABP MajhaCM Eknath Shinde Speech:सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट, मुख्यमंत्र्यांची बॅटिंगShivam Dube speech Vidhan Sabha Maharashtra : मराठी थोडा ट्राय करतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
Embed widget