एक्स्प्लोर

दिवा रुळ घातपात प्रकरणी पाच जण ताब्यात, मुंब्रा पोलिसांची कामगिरी

मुंब्रा: दिवा रेल्वे स्थानकाजवळ संशयास्पद अवस्थेत आढळलेल्या रुळ घातपात प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी ताब्यात 5 जणांना घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. हे पाचही जण व्यसनी असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आहे. तब्बल अडीच महिन्यानंतर पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. ही कारवाई मुंब्रा शहर पोलिसांनी केली आहे. याबाबत अद्याप जीआरपी पोलिसांना कोणतंही यश मिळू शकलेलं नव्हतं. दरम्यान, याप्रकरणी पोलीस सध्या कसून चौकशी करत आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा नेमका उलगडा होण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. दिवा रेल्वे स्थानकाजवळ कोकण रेल्वे मार्गावर 25 जानेवारीला 15 फुटी रुळाचा तुकडा ठेवण्यात आला होता. मडगाव-दादर जनशताब्दी एक्स्प्रेसचे लोको पायलट हिरेंद्र कुमार आणि असिस्टंट लोकल पायलट हितेश चिंचोळे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्यावेळी मोठा अपघात टळला होता. घातपातासाठी रेल्वेमार्गावर आडवा रुळ ठेवण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. काय आहे प्रकरण ? 25 जानेवारी रोजी दिव्यात मडगाव-दादर जनशताब्दी एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला होता. गाडीच्या लोको पायलटने ट्रॅकवर 15 फुटी जुना रुळ ठेवल्याचं पाहिलं आणि तात्काळ गाडी थांबवली. स्थानिकांच्या मदतीने रुळ बाजूला करण्यात आला आणि गाडी पुढे काढली. मागच्या तीन महिन्यात देशात रेल्वेचे 3 मोठे अपघात घडले, ज्यामध्ये अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. काही महिन्यांपूर्वी ओडिशाच्या सीमेजवळ असलेल्या आंध्र प्रदेशमधील कुनेरु स्टेशनजवळ जगदलपूर-भुवनेश्वर एक्सप्रेसचे 8 डबे रुळावरुन घसरले होते. या रेल्वे अपघातात 39 पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. कानपूरमध्येही नोव्हेंबरमध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेमागे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिहार पोलिसांनी तीन जणांना अटकही केली होती. कानपूरसारखीच दुर्घटना रक्सौल-दरभंगा रेल्वे मार्गावर घडवल्याचा संशय या तिघांवर आहे. कानपूर अपघातातही त्यांचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. इंदूर-पटना एक्स्प्रेसचा 20 नोव्हेंबर 2016 रोजी कानपूरच्या पुखराया स्टेशनजवळ भीषण अपघात झाला होता. ज्यामध्ये 150 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेमागे एक रॅकेट कार्यरत असून त्याचा म्होरक्या दुबईत आहे, जो भारतविरोधी कारवायांसाठी नेपाळमधील भाड्याच्या गुंडांचा वापर करत आहे. शमसुल होदा असं त्याचं नाव असून तो पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयशी संबंधित असल्याचं म्हटलं जातं. संंबंधित बातम्या:

उभ्या रेल्वे ट्रॅकवर आडवा ट्रॅक, मुंबईत जनशताब्दी पाडण्याचा प्रयत्न?

हिराखंड एक्स्प्रेसचे 8 डबे घसरुन 39 प्रवाशांचा मृत्यू

पाटणा-इंदूर एक्स्प्रेसचे 14 डबे घसरले, 63 प्रवाशांचा मृत्यू

‘डबे घसरले नि डोळ्यादेखत त्या चिमुरडीच्या शरीराचे दोन तुकडे’

जखमेवर मीठ, कानपूर ट्रेन दुर्घटनेतील जखमींना जुन्या नोटा वाटप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
Israel vows Iran response : इकडं इराणच्या बदल्याची आग थेट दिल्लीपर्यंत पोहोचली तिकडं इस्त्रायलकडून थेट संयुक्त राष्ट्र प्रमुखांना नो एन्ट्री!
इकडं इराणच्या बदल्याची आग थेट दिल्लीपर्यंत पोहोचली तिकडं इस्त्रायलकडून थेट संयुक्त राष्ट्र प्रमुखांना नो एन्ट्री!
हिंदू संघटनांचा विरोध, हिंदूच नाराज; साईबाबांच्या मूर्तीविरोधाचं नेमकं प्रकरण काय, A to Z स्टोरी
हिंदू संघटनांचा विरोध, हिंदूच नाराज; साईबाबांच्या मूर्तीविरोधाचं नेमकं प्रकरण काय, A to Z स्टोरी
मंत्रालयात हालचाली गतीमान, 4 दिवसांतच दुसरी बैठक;  निवडणूक आचारसंहितेपूर्वी मोठ्या निर्णयांची शक्यता
मंत्रालयात हालचाली गतीमान, 4 दिवसांतच दुसरी बैठक; निवडणूक आचारसंहितेपूर्वी मोठ्या निर्णयांची शक्यता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nilesh Rane News : निलेश राणे शिवसेनेतून लढणार?; उदय सामंत म्हणाले...ABP Majha Headlines : 7 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सChandrapur : 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शिक्षकाचा अत्याचारNanded : नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं अपहरण करुन बोट छाटलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
Israel vows Iran response : इकडं इराणच्या बदल्याची आग थेट दिल्लीपर्यंत पोहोचली तिकडं इस्त्रायलकडून थेट संयुक्त राष्ट्र प्रमुखांना नो एन्ट्री!
इकडं इराणच्या बदल्याची आग थेट दिल्लीपर्यंत पोहोचली तिकडं इस्त्रायलकडून थेट संयुक्त राष्ट्र प्रमुखांना नो एन्ट्री!
हिंदू संघटनांचा विरोध, हिंदूच नाराज; साईबाबांच्या मूर्तीविरोधाचं नेमकं प्रकरण काय, A to Z स्टोरी
हिंदू संघटनांचा विरोध, हिंदूच नाराज; साईबाबांच्या मूर्तीविरोधाचं नेमकं प्रकरण काय, A to Z स्टोरी
मंत्रालयात हालचाली गतीमान, 4 दिवसांतच दुसरी बैठक;  निवडणूक आचारसंहितेपूर्वी मोठ्या निर्णयांची शक्यता
मंत्रालयात हालचाली गतीमान, 4 दिवसांतच दुसरी बैठक; निवडणूक आचारसंहितेपूर्वी मोठ्या निर्णयांची शक्यता
कॉन्वेंट शाळेत धक्कादायक प्रकार, शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अकोल्यातून अटक, काँग्रेसमधून हकालपट्टी
कॉन्वेंट शाळेत धक्कादायक प्रकार, शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अकोल्यातून अटक, काँग्रेसमधून हकालपट्टी
Prashant Kishore : बिहारी राजकारणात आणखी एक भिडू; प्रशांत किशोरांची अखेर राजकारणात एन्ट्री, कोणत्या आश्वासनांची खैरात?
बिहारी राजकारणात आणखी एक भिडू; प्रशांत किशोरांची अखेर राजकारणात एन्ट्री, कोणत्या आश्वासनांची खैरात?
पाठचा भाऊ अन् बापाच्या अपघाताचं दु:ख पाठीवर असतानाही सरफराज खानचं वादळ; झंझावाती द्विशतक, मुंबईची धावसंख्या 525 पार!
पाठचा भाऊ अन् बापाच्या अपघाताचं दु:ख पाठीवर असतानाही सरफराज खानचं वादळ; झंझावाती द्विशतक, मुंबईची धावसंख्या 525 पार!
Govinda : यापुढे मी डान्स करू शकणार का? पायावरील सर्जरीनंतर गोविंदाचा डॉक्टरांना पहिला प्रश्न
यापुढे मी डान्स करू शकणार का? पायावरील सर्जरीनंतर गोविंदाचा डॉक्टरांना पहिला प्रश्न
Embed widget