एक्स्प्लोर

गिरगावात पहिला क्यूआर कोड चौक, देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते अनोख्या चौकाचं उद्घाटन

मुंबई शहरातील गावदेवी परिसरात असलेल्या ह्यूस मार्गावर गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा चौक उभारण्यात आला आहे.

मुंबई : कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha)  यांच्या संकल्पनेतून मुंबईतील गिरगावात पहिला वहिला क्यूआर कोड चौक (QR Code)  तयार करण्यात आला आहे.  पहिल्या क्यूआर कोड चौकाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मुंबई शहरातील गावदेवी परिसरात असलेल्या ह्यूस मार्गावर गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा चौक उभारण्यात आला आहे. या उद्घाटन कार्यक्रमात सुधीर फडके यांचे पुत्र श्रीधर फडके गीतरामायणाचा कार्यक्रम सादर केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. पाच दशकांपेक्षा जास्त काळ ज्यांनी आपल्या आवाजाने आपल्या मनावर अधिराज्य केलं असे सुधीर फडके यांच्या नावाने स्वरसम्राट श्री सुधीर फडके चौकाचे उद्घाटन झालं. नम्रता आणि कणखरपणा हे त्यांचे वेगळेपण होते . हे याआधी व्हायला हवं होतं पण आन होतंय ही आनंदाची बाब आहे. मंगल प्रभात लोढा मंत्री झाले तेव्हापासून त्यांनी मुंबई आणि मराठी माणसाचे जतन कसे करता येईल यासाठी काम केलं आजचा कार्यक्रम त्याचे उदाहरण आहे. प्रखर राष्ट्रवाद बाबूजीमध्ये होता. मुक्ती संग्रामात त्यांनी मोलाची कामगिरी पार पाडली. मोठे आंदोलन उभारण्यात त्यांची मोलाची भूमिका होती.

क्यूआर कोड चौकाचे वेगळेपण काय?

  • कलारत्नांचे, महापुरुषांचे, थोर संतांचे, विचारवंतांचे अनेक चौक आणि पुतळे उभारले जातात, पण शहरात येणाऱ्या पर्यटकांना अथवा स्थानिकांना त्यांच्याबाबत योग्य माहिती त्वरित मिळत नाही. 
  • बघताक्षणी हा पुतळा कोणाचा? अथवा या चौकाला ज्यांचे नाव दिलंय ते कोण? असे साधे प्रश्न विचारले जातात आणि अनेकदा अनुत्तरित राहतात. 
  • क्यूआर कोड या नव्या संकल्पनेत कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी संगीतकार सुधीर फडके यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचे काम केले आहे. 
  • येथे येणाऱ्या पर्यटकांना किंवा स्थानिकांना एका शिलेमध्ये कोरलेला क्यूआर कोड स्कॅन करून सुधीर फडके यांच्या जीवनकार्याची माहिती काही क्षणात उपलब्ध होणार आहे.


 खरे नायक असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांना खलनायक बनवण्याचा प्रयत्न सातत्याने चालला आहे हे बाबूजींना लक्षात आले. त्यांनी स्वतःचे सर्वस्व पणाला लावत सावरकर यांची प्रत्येक गोष्ट समोर यावी यासाठी चित्रपट केला.  यासाठी बाबूजींना खूप कष्ट करावे लागले. बाबूजी मंतरलेल्या पिढीचे सर्वस्व होते. गीत रामायणाने बाबूजी अजरामर झाले. गीत रामायणाची रचना बाबूजींनी केली. गीत रामायण कधीही ऐकलं तरी त्याचा गोडवा तसाच आहे. कुठलंही तंत्रज्ञान नसताना त्यांनी रामायण उभं केलं. आजही आपल्या समोर चित्र उभे करतात. अशी व्यक्तिमत्व असतात त्यांना आपल्या मनात जपायचं असते. बाबुजींनी  तयार केलेलं वैभव आहे ते पुढच्या पिढीला पोहोचले पाहिजे म्हणून आपण असे चौक तयार केले आहेत,  असे फडणवीस म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्या दिवशी विलिनीकरणाबाबत माझ्या मनात, माझ्या पक्षात फुल स्टॉप : सुप्रिया सुळे
Maharashtra Live News Updates: ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्या दिवशी विलिनीकरणाबाबत माझ्या मनात, माझ्या पक्षात फुल स्टॉप : सुप्रिया सुळे
MNS Organized Chhath Puja: मुंबईत चक्क मनसेकडून छठपूजेचं आयोजन; चर्चांना उधाण, कोणत्या नगरसेवकाने ठेवला कार्यक्रम?
मुंबईत चक्क मनसेकडून छठपूजेचं आयोजन; चर्चांना उधाण, कोणत्या नगरसेवकाने ठेवला कार्यक्रम?
Supriya Sule On NCP Merger: सुनेत्रा पवारांनी सांगितलं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको; आता सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, विलीनीकरणाचा विषय संपवून टाकला!
सुनेत्रा पवारांनी सांगितलं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको; आता सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, विलीनीकरणाचा विषय संपवून टाकला!
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?

व्हिडीओ

Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
FDA Action on Vaishali Roopali Hotel : कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
Meenakshi Shinde : मीनाक्षी शिंदे पुन्हा अडचणीत येणार? प्रतिज्ञापत्रात फक्त 3 दुचाकी, प्रत्यक्षात कंत्राटदाराच्या 1.5 कोटींच्या व्होल्वोतून प्रवास; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुराव्यांसह तक्रार
मीनाक्षी शिंदे पुन्हा अडचणीत येणार? प्रतिज्ञापत्रात फक्त 3 दुचाकी, प्रत्यक्षात कंत्राटदाराच्या 1.5 कोटींच्या व्होल्वोतून प्रवास; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुराव्यांसह तक्रार
मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
FDA Action on Vaishali Rupali Hotel : मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
Sinhagad Technical Educational Institute: सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
SIR Maharashtra : राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
Embed widget