एक्स्प्लोर

Eknath Shinde : ईडी आणि भाजपच्या धास्तीने ठाणेकर एकनाथ शिंदे "बंडवीर"? सोशल मीडियातील व्हायरल पोस्टची चांगलीच चर्चा

एका वृत्तपत्रातील बातमी सोशल मीडियामध्ये चांगलीच व्हायरल होत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजप आणि ईडीच्या धास्तीने बंडाचा पवित्रा घेतला आहे का? अशी चर्चा होऊ लागली आहे.

Eknath Shinde : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीने शिवसेनेमध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेत उभी फूट पडते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली. एकनाथ शिंदे यांनी आता शिवसेनेच्या धनु्ष्यबाणावर दावा करण्यास सुरुवात केल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यामध्ये राजकीय संघर्ष अटळपणे दिसू लागला आहे.   

दरम्यान, एका वृत्तपत्रातील बातमी सोशल मीडियामध्ये चांगलीच व्हायरल होत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी भाजप आणि ईडीच्या धास्तीने बंडाचा पवित्रा घेतला आहे का? अशी चर्चा होऊ लागली आहे. त्या बातमीमध्ये म्हटले आहे की, एकनाथ शिंदे यांचे आर्थिक व्यवहार सांभाळणारे सचिव सचिन जोशी यांना दहा दिवसांपूर्वी ईडीची नोटीस आली होती. ही नोटीस आल्यापासून ते ठाण्यातून गायब आहेत. सचिन जोशी कुठे आहेत? आणि त्यांना बजावलेल्या ईडीच्या नोटिशीचा एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी काय संबंध आहे, अशी चर्चा रंगली आहे" असे या बातमीमध्ये म्हटले आहे. मात्र ही बातमी कोणत्या वृत्तपत्रातील आहे याची माहिती समजून येत नाही. 

Eknath Shinde : ईडी आणि भाजपच्या धास्तीने ठाणेकर एकनाथ शिंदे
 
सध्या शिवसेनेचे अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. या नेत्यांना ईडीची चांगलीच धास्ती वाटू लागली आहे. त्यामुळे ईडीने त्रस्त असलेले सर्व नेते एकत्रित होऊन आता एकनाथ शिंदे यांच्या समर्थनासाठी गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत.  

नाराजांचा मुद्दा विचारधारेचा पण खरी अडचण ईडीची पीडा

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजपने ईडीसह केंद्रीय तपास यंत्रणांचा केलेला यथेच्छ वापर केल्याचे काही लपून राहिलेला नाही. राज्यातील शिवसेनेचे अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. यामध्ये शिवसेना मुलुख मैदानी तोफ असलेल्या संजय राऊत यांनाही दणका बसला आहे. मिलिंद नार्वेकर यांनाही बंगला पाडावा लागला. इतकचं नव्हे, तर मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत ईडी पोहोचली. श्रीधर पाटणकर ( रश्मी ठाकरे यांचे बंधू) यांचीही संपत्ती जप्त झाली आहे. भाजप नेते महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेवर दररोज गल्लीपासून दिल्लीपर्यंत आरोप करत आहेत. त्यामुळे अनेक शिवसेना नेत्यांनी ईडीची धास्ती घेतली आहे. बंडाळीचे नेतृत्व करत असलेल्या एकनाथ शिंदे यांनीही ईडीची धास्ती घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. 

अनिल परब, प्रताप सरनाईक, भावना गवळी, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर, आनंदराव अडसुळ, रवींद्र वायकर, या सर्व नेत्यांना ईडीचा दणका बसला आहे. मात्र, अनिल परब यांचा अपवाद वगळता या सर्व नेत्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी भाजपची वाट धरल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Disha Salian & Aaditya Thackeray: ...तर उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरे देश सोडून... रामदास कदमांचं मोठं वक्तव्य
शिवसेनाप्रमुखांच्या नातवावर बलात्काराचा आरोप होणे गंभीर गोष्ट, लाज असती तर उद्धव-आदित्य ठाकरेंनी आतापर्यंत देश सोडला असता: रामदास कदम
Video: ओ अनिल परब, तुमच्यात हिंमत आहे का, तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते मी, चित्रा वाघ यांचा सभागृहात रुद्रावतार
Video: ओ अनिल परब, तुमच्यात हिंमत आहे का, तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते मी, चित्रा वाघ यांचा सभागृहात रुद्रावतार
Chhattisgarh Naxal Encounter : बस्तरमध्ये दोन चकमकीत 24 नक्षलींचा खात्मा; विजापूरमध्ये 20, कांकेर चकमकीत 4 मृतदेह आणि शस्त्रे जप्त, एक जवान शहीद
बस्तरमध्ये दोन चकमकीत 24 नक्षलींचा खात्मा; विजापूरमध्ये 20, कांकेर चकमकीत 4 मृतदेह आणि शस्त्रे जप्त, एक जवान शहीद
Disha Salian Case : तीन वर्षापूर्वी 'त्या' पत्रकार परिषदेत दिशा सालियनचे आई-वडील ओक्साबोक्सी रडत काय म्हणाले होते?
तीन वर्षापूर्वी 'त्या' पत्रकार परिषदेत दिशा सालियनचे आई-वडील ओक्साबोक्सी रडत काय म्हणाले होते?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Gaikwad on Disha Salian case | पुरावे नसल्यानेच आदित्य ठाकरेंना क्लीनचीट देण्यात आली- गायकवाडNaresh Mhaske on Disha Salian : बनाव आहे म्हणणाऱ्यांनी तारखा आणि कॉल डिटेल्स तपासावेत- नरेश म्हस्केNitesh Rane on Disha Salian : बलाXXXचा आरोप आहे, अटक करा! दिशा प्रतरणात राणेंची मोठी मागणी...Yogesh Kadam on Disha Salian : दिशा सालियन प्रकरणाची चौकशी कुठवर? योगेश कदमांनी दिली A टू Z माहिती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Disha Salian & Aaditya Thackeray: ...तर उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरे देश सोडून... रामदास कदमांचं मोठं वक्तव्य
शिवसेनाप्रमुखांच्या नातवावर बलात्काराचा आरोप होणे गंभीर गोष्ट, लाज असती तर उद्धव-आदित्य ठाकरेंनी आतापर्यंत देश सोडला असता: रामदास कदम
Video: ओ अनिल परब, तुमच्यात हिंमत आहे का, तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते मी, चित्रा वाघ यांचा सभागृहात रुद्रावतार
Video: ओ अनिल परब, तुमच्यात हिंमत आहे का, तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते मी, चित्रा वाघ यांचा सभागृहात रुद्रावतार
Chhattisgarh Naxal Encounter : बस्तरमध्ये दोन चकमकीत 24 नक्षलींचा खात्मा; विजापूरमध्ये 20, कांकेर चकमकीत 4 मृतदेह आणि शस्त्रे जप्त, एक जवान शहीद
बस्तरमध्ये दोन चकमकीत 24 नक्षलींचा खात्मा; विजापूरमध्ये 20, कांकेर चकमकीत 4 मृतदेह आणि शस्त्रे जप्त, एक जवान शहीद
Disha Salian Case : तीन वर्षापूर्वी 'त्या' पत्रकार परिषदेत दिशा सालियनचे आई-वडील ओक्साबोक्सी रडत काय म्हणाले होते?
तीन वर्षापूर्वी 'त्या' पत्रकार परिषदेत दिशा सालियनचे आई-वडील ओक्साबोक्सी रडत काय म्हणाले होते?
Anil Parab : किरीट सोमय्याची बायको आत्महत्या करायला चालली होती, जयकुमार गोरेंचे उघडे, नाXडे फोटो सभागृहात आले; अनिल परबांचा हल्लाबोल
किरीट सोमय्याची बायको आत्महत्या करायला चालली होती, जयकुमार गोरेंचे उघडे, नाXडे फोटो सभागृहात आले; अनिल परबांचा हल्लाबोल
मोठी बातमी : राज्यातील सरकारी शाळांना CBSE अभ्यासक्रम लागू, शिक्षणमंत्र्यांची सभागृहात घोषणा
मोठी बातमी : राज्यातील सरकारी शाळांना CBSE अभ्यासक्रम लागू, शिक्षणमंत्र्यांची सभागृहात घोषणा
Disha Salian death case: दिशा सालियनच्या फ्लॅटवर आदित्य ठाकरे असल्याचे पुरावे, 44 फोन कॉल; सतिश सालियान यांच्या वकिलाचा गंभीर आरोप
दिशा सालियनच्या फ्लॅटवर आदित्य ठाकरे असल्याचे पुरावे, 44 फोन कॉल; सतिश सालियान यांच्या वकिलाचा गंभीर आरोप
Aaditya Thackeray on Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात गंभीर आरोपांची राळ उठली, सभागृहात अटकेची मागणी; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
दिशा सालियन प्रकरणात गंभीर आरोपांची राळ उठली, सभागृहात अटकेची मागणी; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget