एक्स्प्लोर

Navratri 2022 : हृदयद्रावक! दांडिया खेळताना मुलाचा मृत्यू, धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण

Navratri 2022 : दांडिया खेळताना तरुणाचा हृदयविकाराचा झटक्याने ( Heart Attack) मृत्यू झाला. डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाल्याने त्याच्या वडिलांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि पिता पुत्रांचे रुग्णालयातच निधन झालं.  

मुंबई : विरारमध्ये (Virar ) हृदय पिळवटून टाकणारी एक घटना घडली आहे. दांडीया (Dandiya ) खेळताना मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूच्या धक्याने पित्याने आपले प्राण सोडले.  मनीषकुमार जैन असं मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर नरपत जैन असं मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या पित्याचे नाव आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

दांडिया खेळत असाताना शनिवार रात्री 35 वर्षीय मनीषकुमार जैन या तरुणाचा हृदयविकाराचा झटक्याने ( Heart Attack) मृत्यू झाला. डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाल्याने त्याच्या वडिलांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि पिता पुत्रांचे रुग्णालयातच निधन झालं.  

विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथील एव्हरशाईन अवेन्यू या इमारतीमध्ये नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. शनिवारी रात्री दांडिया सुरू असताना मनीषकुमार जैन या तरुणाला हृदयविकाराचा झटका आला. त्याचे वडील नरपत जैन यांनी नागरिकांच्या मदतीने  त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेले. मात्र रिक्षामध्येच मनीषकुमारचा मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू झाल्याचे बघताच त्याचे वडील नरपत जैन यांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  

जैन कुटुंबियांचा सोन्याचे दागिने खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. मयत मनीष जैन ज्याचे तीन महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. मनिष वडिलांच्या व्यवसायात मदत करत होता. नरपत जैन यांच विरार जैन समाजामध्ये चांगल प्रस्थ होतं. तसेच सोसायटीमध्ये  देखील दोघांचही  वागणं मनमिळाऊ होतं. त्यामुळे दोघांच्या मृत्यूने सोसायटीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.  बुलढाण्यात देखील अशीच एक घटना घडली आहे. दांडिया खेळत असताना एकाचा मृत्यू झालाय. 

बुलढाण्यात दांडिया खेळताना एकाचा मृत्यू

दांडिया खेळत असताना हृदय विकाराचा तीव्र झटक्या आल्याने हॉटेल व्यावसायिक असणाऱ्या विशाल पडधरीया (47 वर्ष) यांचा मृत्यू झाल्याची घटना मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे रात्री घडली आहे. येथील पडधरीया कुटुंब गेल्या काही वर्षांपासून आपल्या घरासमोर देवी बसवत असतात. या देवी समोर रात्री दांडिया खेळत असताना विशाल दलीचंद पडधरीया यांना अचानक चक्कर आल्याने ते जमीनीवर  कोसळले.  त्यांना तत्काळ अनघा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मनमिळावू स्वभावामुळे विशाल पडधरीया यांचा मोठा मित्र परिवार असून त्यांच्या निधनाची वार्ता कळताच येथील व्यापारी बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवली होती.

महत्वाच्या बातम्या

Navratri 2022 : गरबा खेळताना अचानक छातीत दुखू लागलं, मुलुंडमध्ये तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jaysingrao Pawar on Mogalmardini Tararani : मोगलमर्दिनी महाराणी ताराराणींची शौर्यगाथा कहाणी जगासमोर!Uddhav Thackeray Andheri Melava | ठिणगी पडली, पाणी टाकलं, ठाकरेंच्या मेळाव्यात स्टेजवर काय घडलं?Sharad Pawar Speech Kolhapur:बोलताना धाप,मध्ये-मध्ये खोकला,व्हाईट आर्मीच्या कार्यक्रमात पवारांचे धडेRatnagiri Uday Samant : उद्या रत्नागिरीतून ठाकरे पक्षाला खिंडार, उदय सामंत यांचं वक्तव्य ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
Embed widget