एक्स्प्लोर

आया बहिणींचा उद्धार करत, हातपाय तोडून टाकतो म्हणत कोल्हापुरात सत्ताधारी 'भाऊ'कडून खंडणी उकळल्याचा प्रकार, प्रदर्शन मंडपही अचानक कोसळला

कोल्हापूर : धास्तावलेल्या व्यावसायिकांनी या प्रकरणामध्ये कोणतेही न तक्रार न देता पुन्हा कोल्हापुरात पाय न ठेवण्याचा निर्णय घेत त्यांनी काढता पाय घेतला आहे. 

कोल्हापूर : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची खंडणी प्रकरणामध्ये निर्घृण हत्या झाल्यानंतर बीडमधील दंडेलशाही राज्यासमोर आली होती. हा घृणास्पद प्रकार ताजा असताना कोल्हापूरमध्ये सुद्धा आता सत्ताधारी भाऊकडून दोन लाखांची खंडणी न मिळाल्याने थेट हँडलूम प्रदर्शनाचा मंडप अचानक कोसळण्यासाठी 'हातभार' लावला का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे कोल्हापूरमधील पुन्हा एकदा उद्योजकांमधील भुरट्या भाऊंची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. रविवारी अचानक मंडप कोसळल्याने या प्रकरणाला वाचा फुटली असून धमकीचा कॉल सुद्धा मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. मंडपाच्या खांबाना आधार देण्यासाठी बाजूने जे लोखंडी क्रॉस लावतात ते काढण्यात आल्याने मंडप अचानक कोसळला. सुदैवाने त्या ठिकाणी टेम्पो असल्याने कोणती जीवितहानी झाली नाही. मात्र भाऊच्या मोगलाईची सर्वत्र चर्चा रंगली आहे. धास्तावलेल्या व्यावसायिकांनी या प्रकरणामध्ये कोणतेही न तक्रार न देता पुन्हा कोल्हापुरात पाय न ठेवण्याचा निर्णय घेत त्यांनी काढता पाय घेतला आहे. 

खंंडणीसाठी सत्ताधारी भाऊचीच मोगलाई 

कोल्हापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून ऐतिहासिक दसरा चौकामध्ये परप्रांतीय व्यावसायिकांकडून हँडलूम प्रदर्शन सुरू होतं. मात्र, प्रदर्शन सुरू झाल्यानंतर नेहमीप्रमाणे या ठिकाणी संबंधित व्यवसायिकांना खंडणीसाठी त्रास देण्यास सुरुवात झाली. हा त्रास देणाऱ्यांमध्ये दुसरे तिसरे कोणी नसून सत्ताधारी पक्षाचाच भाऊ होता. तो जिल्ह्यात महत्वाच्या पदावर आहे. त्यामुळे खंडणीची चटक लागलेल्या या सत्ताधारी भाऊने त्याचा मध्यस्थी विशालकडून या व्यवसायिकांना गेल्या काही दिवसांपासून सतत दोन लाखांच्या खंडणीसाठी धमकावण्यास आणि मिळेल त्या मार्गाने कोंडी करण्याचा प्रयत्न केला. 

मात्र, व्यावसायिकांना प्रदर्शनात अल्प प्रतिसाद मिळाल्याने दोन लाखांची खंडणी अशक्यप्राय होती. त्यामुळे थेट भाऊनेच त्यांना फोन करत धमकावण्यास सुरुवात केली. मात्र, खंडणीसाठी प्रतिसाद न मिळाल्याने अत्यंत शिवराळ भाषेमध्ये शिवीगाळ करत, हातपाय तोडतो म्हणत, खंडणीसाठी नेमलेल्या मध्यस्थांना भाऊने फोनवरून धमकी दिली. अत्यंत शिवराळ भाषेत धमकी दिल्याचा प्रकार दिल्याचा कॉल सुद्धा मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. सत्ताधारी पक्षाचाच भाऊच जर या पातळीवर परप्रांतीयांना धमकावत असेल, व्यापार करू देत नसतील तर या उद्योजकांनी जायचं कुठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

कोल्हापूरमध्ये उद्यमनगरात खंडणीसाठी झालेला खून ताजा असतानाच आता परप्रांतीय व्यावसायिक सुद्धा अशा पद्धतीने कोल्हापूरमध्ये येऊन खंडणीच्या त्रासाला कंटाळून कोल्हापूरमध्ये येणारच नाही म्हणत असतील तर कोल्हापूरचा विकास होणार तरी कसा असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. धमकीचा कॉल सोशल मीडियामध्ये व्हायरल होऊन सुद्धा कोणतेही कारवाई करण्यात आलेली नाही.

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gokul : गोकुळसाठी महायुतीचा अध्यक्ष ठरला? शिवसेना आमदाराच्या भावाच्या नावाची चर्चा, अध्यक्षपद शिंदेंच्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता
गोकुळसाठी महायुतीचा अध्यक्ष ठरला? शिवसेना आमदाराच्या भावाच्या नावाची चर्चा, अध्यक्षपद शिंदेंच्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता
Gokul : सतेज पाटलांनी निकालानंतर उन्माद केला, अध्यक्ष निवडीचा बहुमान परमेश्वराने आम्हाला दिला, अध्यक्ष महायुतीचाच होईल; बोलता-बोलता हसन मुश्रीफांचा इशारा
सतेज पाटलांनी निकालानंतर उन्माद केला, अध्यक्ष निवडीचा बहुमान परमेश्वराने आम्हाला दिला, अध्यक्ष महायुतीचाच होईल; बोलता-बोलता हसन मुश्रीफांचा इशारा
Gokul Kolhapur : शासनाचे ते चार संचालक 'गोकुळ'साठी मतदान करणार का? निवडणूक अधिकाऱ्याकडे सर्वाधिकार; राजू शेट्टी भडकले, न्यायालयावर तुटून पडले
शासनाचे ते चार संचालक 'गोकुळ'साठी मतदान करणार का? निवडणूक अधिकाऱ्याकडे सर्वाधिकार; राजू शेट्टी भडकले, न्यायालयावर तुटून पडले
Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही

व्हिडीओ

Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
Raju Shetti: तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
Vivekanand Patil Kolhapur Gokul Morcha speech: मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
Embed widget