(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Exclusive : ड्रग्स सप्लायरविरुद्ध लढा कठीण, आमच्यावर गंभीर हल्ले झालेत मात्र कारवाई करणारच: समीर वानखेडे
NCBचे मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींवरील कारवाई असो की मुंबई गोवामधील ड्रग्स माफियांवर धडक कारवाया केल्या आहेत.
मुंबई : एनसीबीचे (NCB) मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचे नाव गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींवरील कारवाई असो की मुंबई गोवा मधील ड्रग्स माफियांवर वानखेडे यांनी धडक कारवाया केल्या आहेत. नुकतेच त्यांनी मुंबईत क्रुझवरील रेव्ह पार्टी मध्ये थेट बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या मुलाला आर्यनला अटक केली आहे. याच बरोबर आतापर्यंत या प्रकरणात 17 जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्व विषयांवर समीर वानखेडे यांच्याशी एबीपी माझाने खास बातचीत केली आहे.
Sameer Wankhende: ड्रग माफियांचा कर्दनकाळ असलेला अधिकारी, कोण आहेत समीर वानखेडे?
समीर वानखेडे म्हणाले की, ड्रग्स सप्लायर बाबतचा लढा कठीण आहे, आमच्यावर गंभीर हल्ले झालेत. मात्र आमचे कर्तव्य आहे ते करणार आहोत, असं ते म्हणाले. बॉलिवूड कनेक्शनबाबत एनडीपीएस ऍक्टचे उल्लंघन करणार आम्ही कारवाई करणार आहोत, असं ते म्हणाले.
In Pics : धडाकेबाज अधिकारी समीर वानखेडे, ज्यांची पत्नी आहे मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री
मुंबई आणि गोवामध्ये आतापर्यंत 94 केस
मुंबई आणि गोवामध्ये आतापर्यंत 94 केस समोर आल्या आहेत. वर्षभरात गोव्यात 12 केस आतापर्यंत केल्यात. या प्रकरणांमध्ये आजवर 300 लोकांना अटक केली आहे तर ऑर्गनाईज ड्रग्स प्रकरणात 12 गँग उध्वस्त केल्या आहेत. ड्रग्स सप्लायर बाबतचा लढा कठीण आहे, आमच्यावर गंभीर हल्ले झालेत. मात्र आमचे कर्तव्य आहे ते करणार आहोत, असं ते म्हणाले.
समीर वानखेडे म्हणाले की, क्रूझ केससंदर्भात आतापर्यंत 17 अटक झाल्या असून यात दोन कमर्शियल कॉन्टेटीच्या केस आहेत. सध्या हे प्रकरण न्यायिक असल्याने जास्त बोलू शकत नाही. या प्रकरणात एमडी,ए मडीएमए, चरस, हायड्रोफोनीक इत्यादी ड्रग्स या केस मध्ये सापडले आहेत.एक विदेशी नागरिक देखील यात अटक आहे, हायड्रोफोनीक ड्रग्स जप्त केले आहे. यात क्रिप्टोकरन्सी बाबत लिंक आहेत. त्याची चौकशी करु. आम्ही आमचे कर्तव्य करणार, आम्ही जनतेचे सेवक आहोत, आम्ही आमची ड्युटी प्रोफेशनली करीत आहोत, असंही ते म्हणाले.