एक्स्प्लोर
In Pics : धडाकेबाज अधिकारी समीर वानखेडे, ज्यांची पत्नी आहे मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री
Sameer Wankhede
1/7

Sameer Wankhede : काही दिवसांपासून समीर वानखेडे हे नाव खूप चर्चेत आहे. खासकरुन मुंबईमधील काही काळापासून सुरु असलेल्या ड्रग्जविरोधी कारवायांचा धडाका सुरु झाल्यापासून समीर वानखेडे यांचं नाव प्रकाशझोतात आलं. समीर वानखेडे एनसीबीच्या मुंबई कार्यालयात झोनल डायरेक्टर आहेत
2/7

सप्टेंबर 2020 मध्ये त्यांची महसूल गुप्तचर संचालनालयातून एनसीबीवर बदली झाली. अमली पदार्थांशी निगडीत प्रकरणांचे तज्ज्ञ म्हणून त्यांची खास ओळख आहे. आता शाहरुख खानच्या मुलाची चौकशी समीर वानखेडे करत आहेत. सध्या त्यांनी सुरु केलेल्या कारवायाच्या धडाक्यामुळं समीर वानखेडे हे ट्रेंडिंगमध्ये आहेत.
3/7

समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत त्यांच्या नेतृत्वात एनसीबीने कोट्यवधींच्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
4/7

ते आधी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल उपायुक्त होते. त्यानंतर त्यांनी बदली आंध्र प्रदेश आणि दिल्लीत देखील काम केलं.
5/7

आतापर्यंत त्यांनी 2 हजारहून अधिक लोकांविरुद्ध अमली पदार्थविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. तर जवळपास 17 हजार कोटींहून अधिक रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं आहे.
6/7

बॉलिवूडमध्ये समीर वानखेडे या नावाची वेगळी दहशत आहे. समीर वानखेडे यांनी गायक मिका सिंहला मुंबई एअरपोर्टवर परदेशी करंसीसह पकडलं होतं. त्यांच्या नेतृत्वात त्यांच्या टीमनं अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय, राम गोपाल वर्मासह अनेक सेलिब्रिटींच्या घरी छापे मारले आहेत.
7/7

समीर वानखेडे हे मराठीतील अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती आहेत. समीर वानखेडे यांनी 2017 साली मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्याशी विवाह केला. त्यांना जुळी मुलं आहेत.
Published at : 03 Oct 2021 02:32 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















