एक्स्प्लोर
Advertisement
निवडणूक आयोगाकडून 'ते' विवाह सोहळे रद्द करण्याचे आदेश
मतपेट्या ठेवण्यासाठी हॉल घेतल्यामुळे नवी मुंबईतील आगरी कोळी भवनात आयोजित नऊ विवाहसोहळे रद्द करण्याची वेळ आली आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईतील आगरी-कोळी भवनमध्ये लगीनगाठ बांधणाऱ्या जोडप्यांच्या आयुष्यात निवडणूक आयोगाने विघ्न आणलं आहे. मतपेट्या ठेवण्यासाठी हॉल घेतल्यामुळे आगरी कोळी भवनात आयोजित नऊ विवाहसोहळे रद्द करण्याची वेळ आली आहे.
नेरुळ येथील आगरी कोळी भवनामध्ये 23 ते 29 जून दरम्यान नऊ लग्न समारंभ होणार आहेत. या हॉलमध्ये लग्नकार्य करण्यासाठी तीन महिने आधीपासून बुकिंग करण्यात आलेली आहेत.
विविध धर्मातील नऊ लग्नं या सहा दिवसात होणार असतानाच आता अचानक या ठिकाणचे सर्व विवाह सोहळे रद्द करुन इतर ठिकाणी हलवण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे.
कोकण पदवीधर मतदार संघाची मतमोजणी करण्यासाठी आणि मतपेट्या ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने 23 ते 29 जून या कालावधीत हा हॉल भाड्याने घेतला आहे.
निवडणूक आयोगाच्या या पवित्र्यामुळे लग्नकार्य करण्यात मोठी विघ्नं आली आहेत. नऊ विवाह नियोजित असून लग्नपत्रिका वाटण्यात आल्या आहेत.
कॅटरर्स, मंडप डेकोरेशन यांना ऑर्डर दिलेली असल्यामुळे अचानक आम्ही विवाह इतर ठिकाणी हलवायचा कसा, असा संतप्त सवाल वधू-वरांच्या कुटुंबीयांनी उपस्थितीत केला आहे. शहरातील इतर हॉल बुक असल्याने आमच्या मुलांचे विवाह लावायचे कोठे, असा प्रश्न विचारला जात आहे.
पालिका आणि सिडको यांच्या अनेक ठिकाणी जागा असताना आगरी-कोळी हॉलमधील लग्न कार्य रद्द करुन कशाला मतमोजणी घेतली जात आहे, असा प्रश्न विचारत वेळ पडल्यास हॉलच्या समोर आमच्या मुलांची लग्नं लावू असा आक्रमक पवित्रा कुटुंबियांनी घेतला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
नागपूर
Advertisement