एक्स्प्लोर

मराठी माणसाच्या महाराष्ट्रातील परिस्थितीला एकनाथ शिंदे जबाबदार; संजय राऊतांनी थेट सुनावलं

Sanjay Raut Full PC : निवडणुकीत भारत-पाकिस्तान नाही भारत खलिस्तान होणार असंही भाष्य त्यांनी केलं आहे. 

Sanjay Raut on BJP : मराठी माणसाची महाराष्ट्रात (Maharashtra Political Updates) ही परिस्थिती आहे, याला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जबाबदार असल्याचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत. निवडणुकीत भारत-पाकिस्तान (India-Pakisthan) नाही भारत खलिस्तान होणार असंही भाष्य त्यांनी केलं आहे. तसेच, राष्ट्रवादीचा फुटलेल्या गटातील काही लोकांना भाजपनं (BJP) काही काळासाठी निवडणूक आयोगात मेंबर केलंय, असं म्हणत संजय राऊतांनी थेट अजित पवार गटावरही (Ajit Pawar Group) निशाणा साधला आहे. 

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, "महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या परिस्थितीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी जबाबदार आहे. त्यामुळेच शिवसेनेला कमकुवत करण्यात आलं. शिवसेना तोडण्याचं मुख्य कारण म्हणजे, मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी माणसाचा आवाज दाबला जाईल. मुंबईमधील मराठी माणसाचा आवाज, ताकद संपवण्यासाठीच भारतीय जनता पक्षानं शिवसेना तोडली आहे. तसेच, एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक बेईमान आहेत, हे सर्व जबाबदार आहेत. यातून आम्ही धडा घेतलाय, येत्या दिवसांत पाहाच काय होतंय." 

निवडणुकीत भारत-पाकिस्तान नाही भारत खलिस्तान होणार : संजय राऊत 

आज कॅनडात सुरुवात केलीये, नंतर ब्रिटनमध्ये आले, आता हळूहळू दिल्लीत येतील, मग 2024 पर्यंत संपूर्ण वातावरण खराब केल्यानंतर आता देशाला कसा धोका आहे आणि एकच आपले नेता आहे, बाकी कोणीच नाही? असं सांगत भाजप प्रचार करेल, असं म्हणत संजय राऊतांनी थेट निशाणा साधला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी 10 वर्षांपूर्वी पाकिस्तानबाबत बोलायचे, त्यावेळी आम्हाला गर्व व्हायचा की, पंतप्रधानांची छाती 56 इंचाची आहे आणि पाकिस्तानला ते संपवूनच टाकणार, पण आता या निवडणुकीत भारत-पाकिस्तान नसेल, तर भारत-खलिस्तान असेल, याचीच तयारी सध्या देशात सुरू आहे, असं संजय राऊत म्हणाले. 

फुटलेल्या राष्ट्रवादीच्या गटाला भाजपनं निवडणूक आयोगाचं मेंबर केलंय : संजय राऊत

संजय राऊत म्हणाले की, "सुप्रीया सुळेंची भिती ही रास्त आहे. कारण खरंच इथे काहीही होऊ शकतं. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे काहीजण रोज नवनव्या तारखा द्यायचे. आता निर्णय आमच्याच बाजूनं लागणार, चिन्ह आम्हालाच मिळणार, अशी भाकितं करायचे. हे कोणत्या आधारावर सांगायचे? जणू यांना निवडणूक आयोगाचं मेंबर केलंय, असे ते तारखा सांगायचे. तसंच, आज बहुतेक फुटलेल्या राष्ट्रवादीच्या गटाला भाजपनं भारतीय निवडणूक आयोगाचं मेंबर करुन घेतलंय. पण लक्षात घ्या संविधान अजून जिवंत आहे."

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
Embed widget