Dasara Melava : शिंदेंच्या दसरा मेळाव्याला पंतप्रधान मोदी आणि अमित शाह येणार?
Eknath Shinde : शिंदे विरुद्ध ठाकरे हा वाद आता ठाकरे विरुद्ध मोदी-शाह असाच रंगला आहे.
![Dasara Melava : शिंदेंच्या दसरा मेळाव्याला पंतप्रधान मोदी आणि अमित शाह येणार? Eknath Shinde Planning for Dasara Melava PM Narendra Modi and Amit Shah Dasara Melava : शिंदेंच्या दसरा मेळाव्याला पंतप्रधान मोदी आणि अमित शाह येणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/14/f458f8ca8fc7f4925d81820d366c0c911663137790052369_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Eknath Shinde Planning for Dasara Melava : दसरा मेळाव्यावरून सध्या राडा सुरु आहे, त्यात यंदाच्या मेळाव्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जाणार आहेत. पण शिंदे विरुद्ध ठाकरे हा वाद आता ठाकरे विरुद्ध मोदी-शाह असाच रंगला आहे. त्यामुळेच की यंदा एकनाथ शिंदें (Eknath Shinde) यांनी दसरा मेळाव्याचं निमंत्रण अमित शाहा (Amit Shah) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना दिल्याची चर्चा सुरु झाली आहे.
शिंदेंच्या दसरा मेळाव्याला (Dasara Melava ) अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित रहाणार ?
सध्या महाराष्ट्रात दसरा मेळाव्यावरून चांगलाच राजकारण रंगले आहे. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्यावर जाऊन अमित शाह यांना दसरा मेळाव्याचे निमंत्रण दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. एक दिवसाचा दिल्ली दौरा नियोजित असताना तो दोन दिवसाचा झाल्याने यामध्ये अनेक गाठीभेटी झाल्याची चर्चा आहे. शिंदे गटाचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे, त्यामुळे युतीतले सहकारी आणि सत्ता बनवण्यामागचे चाणक्यांनाच दस-याच्या व्यासपीठावर एकनाथ शिंदे आणू शकतात. त्यात थेट ठाकरेंना टक्कर द्यायची तर एकनाथ शिंदे यांना काहीतरी वेगळं करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुक लक्षात घेता असा प्रयोग एकनाथ शिंदे गटाकडून केला जाऊ शकतो. नव्या सत्ता स्थापनेपासून शिंदे आणि दिल्लीत घट्ट मैत्री झाल्याचं अनेकवेळा दिसलं आहे. त्यात शिंदे आणि भाजपची लढाई आता थेट ठाकरेंच्या विरोधात आहे. त्यामुळे शिंदे दसरा मेळाव्याच्या मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना बोलवू शकतात.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला बीकेसी मैदानात परवानगी मिळाली आहे. शिंदे गटातले ५० आमदार, माजी नगरसेवक आणि काही नेते आपली ताकद पणाला लावून आपले कार्यकर्ते मुंबईत आणणार आहेत. त्यासाठी बसेस, ट्रेनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. लाखोंच्या संख्येनं गर्दी जमणार असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जातोय. त्यामुळेच ठाकरेंना टक्कर देण्यासाठी दिल्लीश्वरांना पाचरण केलं जाऊ शकतं. अमित शाहा गणेशोत्सवात मुंबईत येऊन गेले आणि ठाकरेंना चॅलेंज देऊन गेले. त्यानंतर गटप्रमुखांच्या मेळाव्यात ठाकरेंनीही शाह यांना ललकारलं आहे. आता त्यालाच उत्तर देण्यासाठी मोदी शाहांची जोडगोळी शिंदेंच्या मंचावर आली तर नवल वाटायला नको.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)