Aaditya Thackeray : एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचं आहे का? 20 मे रोजी विचारलं होतं, आदित्य ठाकरेंचा खुलासा!
Aaditya Thackeray : शिवसेना कधीच संपणार नाही, शिवसेना पूर्ण ताकतीने पुन्हा एकदा नव्याने जोमाने उभा राहील असा आत्मविश्वास शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
Aaditya Thackeray : जे पळून गेले आहेत त्यांना शिवसेना संपवायची होती, पण शिवसेना कधीच संपणार नाही, शिवसेना पूर्ण ताकतीने पुन्हा एकदा नव्याने जोमाने उभा राहील असा आत्मविश्वास शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. न्यायालयीन लढाई सुरू असून न्यायालयामध्ये आमचा व्हीप खरा होता, हे सिद्ध होईल असेही ते म्हणाले.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत मोठा खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे यांना 20 मे रोजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री व्हायचं आहे का? अशी विचारणा त्यांच्याकडे करण्यात आली होती असा खुलासा त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकीसाठी तयारीत रहा, असा पक्षाच्या आमदारांना दिला आहे. याबाबत त्यांना विचारले असता आदित्य ठाकरे यांनी मध्यावधी निवडणुकीसाठी तयार असल्याचे सांगितले. बंडखोर आमदार अजूनही मतदारसंघांमध्ये परतले नाहीत. ज्यावेळी परततील तेव्हा त्यांना मतदारांना तोंड द्यावं लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
कुर्ल्यामध्ये इमारत कोसळल्यानंतर मध्यरात्री दोन वाजता त्या ठिकाणी पोहोचलो होतो. मात्र, तेथील आमदार गुवाहाटीमध्ये पार्टी करत होते. या आमदारांना कधी ना कधीतरी मतदारांना सामोरे जावे लागेल असे ते म्हणाले.
विधानसभा अध्यक्षपद निवडणूक अवैध
काल झालेली विधानसभा अध्यक्ष निवडणूक अवैध असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. ज्यांनी व्हीपचे उल्लंघन केलं आहेय त्यांच्यावर कारवाई होईल, असेही त्यांनी सांगितले. न्यायालयात आमचा व्हीप खरा असल्याचे सिद्ध करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Maharashtra Politics Timeline : बंड ते बहुमत चाचणी! 21 जूनच्या रात्रीपासून आजपर्यंत नेमकं काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर
- Maharashtra Politics Shivsena : बंडखोर आमदारांची संख्या 40 वर, उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेणार? शिवसेना भवनवर आज बैठक
- Ajit Pawar : ठरलं! राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार; औपचारिक घोषणा बाकी