एक्स्प्लोर

Anil Deshmukh यांना ईडीकडून समन्स, कार्यालयात हजर राहण्याची सूचना

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. काल झाडाझडती केल्यानंतर आज ईडीने त्यांना समन्स बजावून कार्यालयात हजर राहण्याची सूचना केली आहे.

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ईडीने काल (25 जून) पाच ठिकाणी झाडाझडती केल्यानंतर आज अनिल देशमुख यांना समन्स बजावला आहे. देशमुख यांना आज सकाळी अकरा वाजता दक्षिण मुंबईतील कार्यालयात हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात हा समन्स बजावण्यात आला आहे. ईडीने काल त्यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरांवर छापे टाकले होते.

दरम्यान याआधी अनिल देशमुख यांचे पीए कुंदन शिंदे आणि पीएस संजीव पालांडे यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली. मनी लॉण्ड्रिंग (PMLA) प्रकरणात ईडीने दोघांविरोधात ही कारवाई केली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. आज (26 जून) सकाळी अकरा वाजता त्यांना PMLA कोर्टात हजर केलं जाईल. अनिल देशमुख यांच्यावरही ईडी कारवाई करु शकते, असं समजतं.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. ज्यावेळी याबाबत चर्चा सुरु होती, तेव्हा त्या खोलीत अनिल देशमुख यांच्यासह त्यांचे पर्सनल सेक्रेटरी संजीव पालांडे देखील उपस्थित होते.

वैफल्यग्रस्तांकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर : संजय राऊत
सत्ता गमावल्यामुळे वैफल्यग्रस्तांकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सत्ताधारी पक्षातील विनाकारण त्रास दिला जात आहे, आम्ही सुद्धा पाहून घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला. अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली.

देशमुख यांच्या नागपूर, मुंबईतील घरांवर ईडीचा छापा
ईडीने काल (25 जून) मनी लॉण्ड्रिंग प्रकरणाच्या तपासासाठी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरावर छापा टाकून झाडाझडती केली. PMLA कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील  जीपीओ चौक परिसरातील निवासस्थानी तसंच त्यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्या मुंबईतील निवासस्थानी छापेमारी करण्यात आली. संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडी कार्यालयात नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. ईडीने देशमुख यांच्या घरातील प्रत्येक किल्ली मागवून अगदी एक एक ड्रॉवर तपासले. यावेळी सर्व कागदपत्रे पाहण्यात आली. ईडीच्या टीमने देशमुख यांची चौकशी केली नाही. सव्वा तीन तासाने ईडी टीम निघून गेली. तिथून देशमुख वरळीच्या घरी पोहोचले. वरळी आणि नागपूर इथे तपास पूर्ण झाल्यानंतर दोन्ही ठिकाणी देशमुख कुटुंबियांचे जबाब घेतले. 

अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया
या छाप्यानंतर अनिल देशमुख म्हणाले की, मी ईडीच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य केलं. सत्य समोर येईल, अशी आशा आहे. भविष्यातही तपास यंत्रणांना सहकार्य करत राहू असंही देशमुख यांनी सांगितलं. देशमुख म्हणाले की, "मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी जे माझ्यावर खोटे आरोप केले होते, ते त्यांना पदावरुन हटवण्यात आल्यानंतर केले. ते पोलीस आयुक्त असताना माझ्यावर आरोप केले नाहीत. त्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे आम्ही त्यांना आयुक्तपदावरून हटवलं." 

शरद पवार काय म्हणाले?
या कारवाईबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं आहे की, "अनिल देशमुखांवरील ईडीचे छापे या गोष्टी नवीन नाहीत. याबाबत अधिक चिंता वाटत नाही. अनिल देशमुख यांच्या कुटुंबाला यापूर्वी देखील यंत्रणेद्वारे त्रास दिला आहे. आणखी कुठे त्रास देता येईल का? यासाठी प्रयत्न सुरु आहेत."

शरद पवार म्हणाले की, सार्वजनिक जीवनातल्या एखाद्या राजकीय नेत्याबाबत दुसऱ्या एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याने ठराव करण्याचे यापूर्वी कधी पाहिले नव्हते. चंद्रकांत पाटील हे कर्तृत्ववान गृहस्थ आहेत. आम्हाला यात काही आश्चर्य वाटत नाही, असा टोलाही पवारांनी लगावला. जो राजकीय विचार आपल्याला मान्य नाही त्यांच्यावर दबाव आणण्याचा हा प्रकार आहे, असं पवार म्हणाले. 

संबंधित बातम्या

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरी सव्वातीन तासानंतर ईडीचे तपासणी पूर्ण

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2026 | शनिवार

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Embed widget