ED Raids Anil Deshmukh: 'ईडी'ला पूर्ण सहकार्य केलं, पुढील काळातही करु, कारवाईनंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
ED raids Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापे टाकले होते.. या कारवाईनंतर अनिल देशमुख यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापे टाकले होते. आज सकाळपासून त्यांच्या घरात झाडाझडती सुरु होती. ईडीकडून शुक्रवारी 100 कोटी वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरमधील निवासस्थानी धाडी टाकण्यात आल्या. यावेळी अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडी कार्यालयात नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली.
या कारवाईनंतर अनिल देशमुख यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सीबीआय, ईडी या प्रकरणाचा तपास करत आहेत. ईडीचे अधिकारी आज चौकशी करण्यासाठी आले होते. त्यांना पूर्ण सहकार्य केलं. पुढील काळातही करु, असं देशमुख म्हणाले. देशमुख म्हणाले की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी जे माझ्यावर खोटे आरोप केले होते, ते त्यांना पदावरून हटवण्यात आल्यानंतर केले. ते पोलीस आयुक्त असताना माझ्यावर आरोप केले नाहीत. त्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे आम्ही त्यांना आयुक्तपदावरून हटवलं, असंही ते म्हणाले.
मुंबई आणि नागपूरमधील निवासस्थानी धाडी
ईडीकडून शुक्रवारी 100 कोटी वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरमधील निवासस्थानी धाडी टाकण्यात आल्या. यावेळी अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडी कार्यालयात नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. ईडीने देशमुख यांच्या घरातील प्रत्येक किल्ली मागवून अगदी एक एक ड्रॉवर तपासले. यावेळी सर्व कागदपत्रे पाहण्यात आली. ईडीच्या टीमने देशमुख यांची चौकशी केली नाही. सव्वा तीन तासाने ईडी टीम निघून गेली. तिथुन देशमुख वरळीच्या घरी पोहोचले. वरळी आणि नागपूर इथे तपास पूर्ण झाल्यानंतर दोन्ही ठिकाणी देशमुख कुटुंबियांचे स्टेटमेंट घेतले गेले.
Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरात ईडीचे छापे
मोठ्या फौजफाट्यासह कारवाई
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या कथित वसुलीप्रकरणात अनिल देशमुख यांना राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आज (25 जून) ईडीने त्यांच्या नागपुरातील घरात छापेमारी सुरु केली आहे. ईडी वेगवेगळे कनेक्शन या प्रकरणात तपासू पाहत आहे.