एक्स्प्लोर

Ravindra Waikar: घर अन् कार्यालयावर छापेमारी, 17 जानेवारीला पुन्हा हजर राहण्याच्या सूचना; 15 तासांनी रवींद्र वायकरांची ईडी चौकशी संपली

Ravindra Waikar: तब्बल 15 तासानंतर रवींद्र वायकरांची ईडी चौकशी संपली असून त्यांना 17 जानेवारीला पुन्हा ईडी चौकशीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Ravindra Waikar ED Raids: मुंबई : जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी (Jogeshwari Plot Scam) ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या घरी सकाळी 7 वाजल्यापासून ईडीची छापेमारी (ED Raids) सुरू होती. तब्बल 15 तासानंतर रवींद्र वायकरांची ईडी चौकशी संपली. वायकर यांच्या जोगेश्वरीतील श्याम नगर तलावाजवळील सेवालय कार्यालय आणि मातोश्री क्लबमधून ईडीच्या अधिकाऱ्यांनी सर्व पेपरची तपासणी केल्याची माहिती मिळत आहे. वायकरांशी संबंधित 4 ठिकाणी ईडीची छापेमारी झाल्याचं समोर येत आहे, तर 17 जानेवारीला पुढील चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना रवींद्र वायकरांना देण्यात आल्या आहेत. 

जुलै 2021 मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भ्रष्ट पद्धतीनं जोगेश्वरीतील खेळाचं मैदान ताब्यात घेऊन त्यावर तब्बल 500 कोटी रुपयांचं पंचतारांकित हॉटेल बांधल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकरांवर केला होता. तसेच, यासंदर्भातील तक्रारही सोमय्यांनी केली होती. याचप्रकरणी ईडीकडून रवींद्र वायकरांची चौकशी सुरू आहे.  

भाजप नेते किरीट सोमय्यांचे आरोप नेमके काय?

रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात ही तक्रार होती. मुंबई महापालिकेच्या राखीव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधली आहे. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. सप्टेंबरच्या महिन्यात रविंद्र वायकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला गेला.

प्रकरण नेमकं काय? 

रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात ही तक्रार होती. मुंबई महापालिकेच्या राखिव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधली आहे. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे ही तक्रार करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेनं वायकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. वायकर चौकशीला उपस्थित राहिले होते. त्यानंतर आता वायकरांच्या अडचणीत वाढ झाली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

वायकरांवर आयकरची धाड, साळवींच्या कुटुंबाची ACB चौकशी; निकालापूर्वी ठाकरेंच्या आमदारांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोरोनाने लिंक तुटली, आईच्या निधनानंतर जिद्दीने स्वप्नपूर्ती; तलाठी भाऊसाहेब बनले UPSC अधिकारी
कोरोनाने लिंक तुटली, आईच्या निधनानंतर जिद्दीने स्वप्नपूर्ती; तलाठी भाऊसाहेब बनले UPSC अधिकारी
Pahalgam Terror Attack : धर्माच्या अगोदर माणुसकी, पर्यटकांना रडताना पाहून डोळ्यात पाणी, जखमी मुलाला पाठीवर बसवून धावणाऱ्या सज्जाद भटचा व्हिडिओ व्हायरल
तुमच्याशिवाय आमचं आयुष्य अपूर्ण, माझ्यासाठी धर्माच्या अगोदर माणुसकी येते, सज्जाद भटचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्रातील 500 पर्यटक मायभूमीत उतरले;  उर्वरीत 232 प्रवाशांसाठी आणखी एका विमानाचे उड्डाण
महाराष्ट्रातील 500 पर्यटक मायभूमीत उतरले; उर्वरीत 232 प्रवाशांसाठी आणखी एका विमानाचे उड्डाण
पाकिस्तानचा अब्बाही वाकड्या नजरेने बघणार नाही, हे लिच्यापिच्या काँग्रेसचं सरकार नाही; नितेश राणेंनी सांगितली रणनीती
पाकिस्तानचा अब्बाही वाकड्या नजरेने बघणार नाही, हे लिच्यापिच्या काँग्रेसचं सरकार नाही; नितेश राणेंनी सांगितली रणनीती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Birdev Done IPS Interview : हसता हसता IPS बिरदेव डोणे अचानक इमोशनल, बिरुच्या इंटरव्यूव्हचे किस्सेBSF Jawan in Pakistan's custody : चुकून ओलांडली सीमा, बीएसएफ कॉन्स्टेबल पी.के.साहूंना पाकिस्तानी रेंजर्सने घेतलं ताब्यातJob Majha : नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये नोकरीची संधी, शैक्षणिक पात्रता काय? किती पदांवर जागा? 24 April 2025Special Report On Pahalgam Attack : डोंबिवलीतील लेले, मोने, जोशी कुटुंबाची विषण्ण कहाणी, काय होते थरकाप उडवणारे दहशतवाद्यांचे ते शब्द?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोरोनाने लिंक तुटली, आईच्या निधनानंतर जिद्दीने स्वप्नपूर्ती; तलाठी भाऊसाहेब बनले UPSC अधिकारी
कोरोनाने लिंक तुटली, आईच्या निधनानंतर जिद्दीने स्वप्नपूर्ती; तलाठी भाऊसाहेब बनले UPSC अधिकारी
Pahalgam Terror Attack : धर्माच्या अगोदर माणुसकी, पर्यटकांना रडताना पाहून डोळ्यात पाणी, जखमी मुलाला पाठीवर बसवून धावणाऱ्या सज्जाद भटचा व्हिडिओ व्हायरल
तुमच्याशिवाय आमचं आयुष्य अपूर्ण, माझ्यासाठी धर्माच्या अगोदर माणुसकी येते, सज्जाद भटचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्रातील 500 पर्यटक मायभूमीत उतरले;  उर्वरीत 232 प्रवाशांसाठी आणखी एका विमानाचे उड्डाण
महाराष्ट्रातील 500 पर्यटक मायभूमीत उतरले; उर्वरीत 232 प्रवाशांसाठी आणखी एका विमानाचे उड्डाण
पाकिस्तानचा अब्बाही वाकड्या नजरेने बघणार नाही, हे लिच्यापिच्या काँग्रेसचं सरकार नाही; नितेश राणेंनी सांगितली रणनीती
पाकिस्तानचा अब्बाही वाकड्या नजरेने बघणार नाही, हे लिच्यापिच्या काँग्रेसचं सरकार नाही; नितेश राणेंनी सांगितली रणनीती
कृषी विभागातील लाचखोर अधिकारी जाळ्यात; 30 हजार घेताना ACB कडून रंगेहाथ अटक
कृषी विभागातील लाचखोर अधिकारी जाळ्यात; 30 हजार घेताना ACB कडून रंगेहाथ अटक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 एप्रिल 2025 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 एप्रिल 2025 | गुरुवार 
Pakistan on Indus Waters Treaty : जर भारताने सिंधू नदीचे पाणी रोखल्यास तर ती युद्धखोरी असेल! नाक दाबताच पाकिस्तानचे तोंड उघडले; पाकिस्तान काय म्हणाला? शब्द जसाच्या तसा
जर भारताने सिंधू नदीचे पाणी रोखल्यास तर ती युद्धखोरी असेल! नाक दाबताच पाकिस्तानचे तोंड उघडले; पाकिस्तान काय म्हणाला? शब्द जसाच्या तसा
मोठी बातमी! भारताच्या BSF जवानाने ओलांडली 'बॉर्डर'; पाकिस्तान रेंजर्सने घेतलं ताब्यात
मोठी बातमी! भारताच्या BSF जवानाने ओलांडली 'बॉर्डर'; पाकिस्तान रेंजर्सने घेतलं ताब्यात
Embed widget